आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅगवर लिहिले होते \'बॉम्ब\', काश्मिरच्या विद्यार्थिनीला दिल्ली विमानतळावर पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विमानतळ - Divya Marathi
दिल्ली विमानतळ
नवी दिल्ली - बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयावरुन काश्मीरच्या एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला शुक्रवारी दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थीनीच्या बॅगवर कॅरिइंग बॉम्ब इनसाइड असे लिहिले होते. तिच्या बॅगवरील या वाक्यावर सुरक्षा रक्षकांचे लक्ष्य गेले तेव्हा त्यांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
विद्यार्थीनी श्रीनगरमधील राजबाग परिसरातील आहे. तिच्यासोबत तिचे तीन मित्र होते. ते सर्व ढाका येथून श्रीनगर मार्ग कोलकाता आणि नंतर नवी दिल्लीला आले होते. शुक्रवारी साधारण 11 वाजता ते दिल्लीत पोहोचले.

- विद्यार्थीनी चेक इन करत असताना सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याचे लक्ष्य तिच्या बॅगेवर पडले आणि तिला ताब्यात घेण्यात आले. तिची कसून चौकशी करण्यात आली.
- वास्तविक बॅगवर लिहिलेले वाक्य हे ग्रॅफिटी होती. अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनावर असे वाक्य लिहित असतात.
- विद्यार्थीनीचे श्रीनगर आणि ढाकाच्या प्रवास व तेथील पार्श्वभूमीबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी चौकशी केली, त्यानंतर विद्यार्थीनीला सोडण्यात आले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...