आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमित्त सर्व गरजूंना मेडिकल व्हिसा देऊ : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिवाळीनिमित्त पाकिस्तानमधील सर्व गरजू रुग्णांना भारतातर्फे मेडिकल व्हिसा देण्यात येईल, असे आश्वासन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी दिले. काही पाकिस्तानी नागरिकांनी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केल्यानंतर स्वराज यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.  

पाकिस्तानमधील आमना शमीन या महिलेचे वडील दिल्लीत उपचारासाठी आले आहेत. आमना यांना त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देताना स्वराज यांनी म्हटले आहे की, यासंदर्भात पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला परवानगी देऊ.  

पाकिस्तानमधील अब्दुल्ला नावाच्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या भारतातील उपचारासाठी व्हिसा देण्याची विनंती केली होती. अब्दुल्लाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली असून त्यानंतरची तपासणी त्याला भारतात करायची आहे. अब्दुल्लाची औषधे संपण्याच्या मार्गावर असून त्याला भारतातून त्वरित वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. त्यामुळे त्याला मेडिकल व्हिसा द्यावा, अशी विनंती अब्दुल्लाचे वडील काशिफ यांनी बुधवारी ट्विटरद्वारे स्वराज यांच्याकडे केली होती. त्यावर उत्तर देताना स्वराज यांनी, ‘वैद्यकीय व्हिसा द्यावा, असे आदेश मी भारतीय उच्चायुक्तालयाला दिले आहेत. औषधाअभावी मुलाच्या उपचारात खोळंबा होऊ नये,’ 

असे रिटि्वट स्वराज यांनी बुधवारीच केले होते.  पाकिस्तानमधीलच एका महिलेला भारतात यकृतावरील शस्त्रक्रिया करायची आहे. 
बातम्या आणखी आहेत...