आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The 5 Vote Splitters Whose Entry May Help BJP

बिहारमध्ये हे पाच नेते करतील मतांचे ध्रुवीकरण, कोणाचा किती असेल परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पाटणा - बिहार विधानसभा निवडणूकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. महाआघाडी आणि एनडीए या बदलत्या समीकरणांवर नजर ठेवून आहे, कारण यांचा धोका दोन्ही आघाड्यांना होण्याची शक्यता आहे. खासदार पप्पू यादव, एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारिक अन्वर आणि समाजवादी जनता दलाचे देवेंद्र प्रसाद यादव हे असे पाच नेते समोर आले आहेत जे फारकाही प्रभाव दाखवू शकणार नाही मात्र ते मते खाऊन दुसऱ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. यांचा सर्वाधिक फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे, त्यासोबतच काही ठिकाणी भाजपसाठीही हे अडचणीचे ठरू शकतात.

ओवेसींचा परिणाम किती ?
एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी मुस्लिमांचे फायर ब्रँड नेते म्हणून समोर येत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट पंतप्रधान मोदींना टार्गेट केले होते. मुस्लिमांच्या मागसलेल्या स्थितीला तथाकथित सेक्युलर पक्षही जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप आहे. बिहारआधी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा लढविली आहे. तिथे त्यांना दोन जागांवर (औरंगाबाद मध्य आणि भायखळा-मुंबई) यश मिळाले असले तरी त्यांचा पक्ष मत विभाजन करणारा असल्याचे समोर आले. एमआयएमच्या उमेदवारांचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सर्वाधिक बसला आणि भाजपला लाभ झाला. बिहारमध्ये त्यांनी बहुसंख्येने मुस्लिम मतदार असलेला सीमांचलभागावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथेही त्यांना मते फोडणारा पक्ष म्हणून पाहिले जात आहे.
ओवेसी भाजपचा मोहरा
महाआघाडीचे सर्व घटक पक्ष आरोप करत आहेत की ओवेसी भाजपचा मोहरा आहे. 'डिव्हाइड अँड रुल' - फोडा आणि राज्य करा ही नीती भाजपने अवलंबली असल्याचा आरोप महाआघाडीचे नेते करत आहेत. मात्र ओवेसी हे सर्व आरोप फेटाळून लावतात.
जेडीयू-आरजेडीच्या गडाला बसणार धक्का
कोसी, पूर्णिया यांना एकत्र करुन सीमांचलमध्ये 37 जागा आहेत. यातील सीमांचलमधील 25 जागा एमआयएम लढण्याची शक्यता आहे. येथे मुस्लिमांची निर्णायक मते आहे. किशनगंजमध्ये 68%, कटिहारमध्ये 45%, अररियामध्ये 35% आणि पूर्णियामध्ये 35% मुस्लिम मतदार आहेत. या सर्व मतदारसंघांमध्ये कित्येक दशकांपासून आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसचे राज्य राहिले आहे.
आणखी एक उदाहरण, ओवेसींच्या प्रभावामुळे राणे पराभूत
मुंबईमधील हायप्रोफाइल बांद्रा इस्ट मतदारसंघात झालेल्या पोट निडणूकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा पराभव झाला होता. त्यांना शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी 19000 मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराने 15000 मते घेतली होती.

ओवेसींच्या जमेच्या बाजू
- युवकांमध्ये क्रेझ
- फ्रेश चेहरा
- नवा पक्ष
- आक्रमक भाषण
- मतांचे ध्रुविकरण करणारा नेता
- आक्रमक प्रचार शैली
- मुस्लिमांमध्ये नव्या नेत्याची इमेज

पुढील स्लाइडमध्ये वाचा, पप्पू यादव कोणाला त्रासदायक ठरणार