आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet With Rahul\'s Handpicked 13 New Secretaries

तयारी लोकसभेची: \'राहुल ब्रिगेड\'मध्ये भाजीपाला विकणार्‍याचा मुलगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधी यांनी देशात 13 सचिवांची नियुक्ती केली आहे.

'राहूल ब्रिगेड'मध्ये भाजीपाला विकणार्‍याच्या मुलापासून तर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातावाचाही सहभाग आहे. टीममधील निम्म्यापेक्षा जास्त सचिव राजकीय वारसा नसलेले आहे. राहुल गांधी यांनी या13 सचिवांची दोन दिवस आधी एक बैठक घेतली होती. प्रत्येक पदाधिकार्‍यांवर सोपवण्यात आलेली जबाबदारीचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही राहूल यांनी यावेळी स्पष्ट केले.

राहुल गांधी म्हणाले, महासचिवांनी राज्यांतील 'रोड मॅप' तयार करून जिल्ह्या-जिल्ह्यांचा दौरा करावा. जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घ्या. लोकसभा निवडणुकीत कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नसल्याचे संकेतच जणू राहूल गांधी यांनी दिले आहे. त्यामुळे राहूल गांधी यांनी स्वत: 13 सचिवांची निवड केली आहे. सर्व सचिवांना सोबत घेऊन राहूल गांधी पुढील रणनीती आखणार असल्याचेही समजते. 13 पैकी तीन सचिव सध्या राहुल गांधीसोबत काम करत आहेत.

सरासरी वय 52
ताज्या दमाच्या नेते, कार्यकर्त्यांचा समावेश केल्यामुळे कार्यकारिणीचे सरासरी वय आता 52 वर आले आहे. ज्येष्ठांचा मान राखूनच पक्षात नव्या रक्ताला वाव देण्याचे धोरण राबवण्यात येत आहे, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

समतोल साधण्याचा प्रयत्न
ज्येष्ठांच्या अनुभवाची त्यांना मदत होईल. त्यांचे हे विधान म्हणजे तरुणांना संधी देतानाच पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही, पक्षात समतोल साधण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे.

कशासाठी बैठक
मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगड आणि दिल्लीमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होत आहेत.त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी ही बैठक खास बोलावण्यात आली.या बैठकीपूर्वी राहुल यांनी या चारही राज्यांच्या प्रभारी सरचिटणीसांसोबत प्रत्येकाशी वेगवेगळी चर्चा केली.