आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी अधिका-यांना भेटायचे, तर घ्या संकेतस्थळाचा आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘नाे वेटिंग, नाे क्यू, नाे डिले’ म्हणत केंद्र सरकारमधील चार हजारांवर अधिकारी अापल्याला भेटण्याची वेळ देऊ शकतात. यामुळे वारंवार कार्यालयाच्या फे-या मारताना हाेणारा त्रास वाचणार अाहे. नॅशनल इन्फाॅर्मेटिक सेंटरने (एनअायसी)‘ई व्हिजिटर डाॅट एनअायसी डाॅट काॅम’ नावाचे संकेतस्थळ तयार केले असून या संकेतस्थळाच्या माध्यमातून ८२ विभागांतील अधिका-यांना भेटता येणार अाहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लाेकांचा त्रास कमी व्हावा म्हणून काही संकेतस्थळे सुरू केली अाहेत. ‘mygov’ (माझे सरकार) हे संकेतस्थळ त्यातीलच एक भाग अाहे. मात्र, विविध कामांसाठी अधिका-यांना भेटणे सोयीचे व्हावे म्हणून नागरिक अाणि अधिकारी यांच्यात तंत्रज्ञानाचा दुवा जाेडला अाहे. ई व्हिजिटर या संकेतस्थळावर गेल्यास अापल्याला ज्या विभागातील अधिका-यास भेटायचे अाहे त्याबाबतचा तपशील अाणि अापली माहिती व भेटायचे कारण नाेंदणीद्वारे स्पष्ट केल्यास संबंधित अधिका-याकडून भेटायची वेळ मिळेल. भेटीची पूर्वपरवानगी मिळाल्याने सुरक्षा कर्मचा-यांच्याही त्रासातून मुक्तता मिळेल. नाेंदणीवेळी तुम्हाला काेणत्या दिवशी व किती वाजता भेटायचे अाहे याचा तपशील लिहावा लागणार अाहे. संबंधित अधिका-याकडे उपलब्ध असलेली तारीख अाणि वेळ माेबाइलवर किंवा ई-मेलवर कळवण्यात येईल.

४७११ अधिकारी भेटणार
केंद्र सरकारचे बहुतांश विभाग या संकेतस्थळाशी जाेडण्यात अाले अाहेत. त्यात गृह, मनुष्यबळ, संरक्षण, विदेश, न्याय , परिवहन, सामाजिक न्याय अादींचा समावेश अाहे. या संकेतस्थळावर सुरुवातीच्या टप्प्यात ८२ विभागांतील ४७९१ अधिका-यांना भेटता येणार अाहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अाजपर्यंत या िवभागाचा ३२ हजार ६३७ नागरिकांनी लाभ घेतला अाहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही ही पद्धती सुरू करावी, अशी सूचना केंद्राकडून सर्व राज्यांना करण्यात आली आहे.