आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात मेगा फूड पार्क वाढवून अन्नधान्याची नासाडी थांबणार; सध्या देशात 7 पार्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात सध्या ७ मेगा फूड पार्क सुरू आहेत. २०२२ पर्यंत त्यांची संख्या ३५ वर पोहोचेल. शीतगृहांची क्षमता २.९४ लाख टन आणि वेअरहाऊस क्षमता ४.२ लाख टन एवढी होईल. २०२२ पर्यंत सर्व ४२ फूड पार्क सुरू झाल्यानंतर देशात अन्नधान्य, फळभाज्या, दूधाची नासाडी ६० टक्क्यांनी घटेल, असा दावा फेडरेशन ऑफ मेगा फूड पार्कने केला.

महामंडळाचे सरचिटणीस ह्रतिक बहुगुणा म्हणाले, फूड पार्क ग्रामीण भागाजवळ सुरू केले जात आहे. आता ३० पार्कमध्ये काम सुरू आहे. तीन पार्कला अलीकडेच अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. उर्वरित दोन पार्कला लवकरच मंजुरी मिळण्याची आशा आहे.पिकांची कापणे व त्यानंतरच्या कामामुळे ३.९ (६ टक्के) धान्य, ४.३ (६.१ टक्के) डाळी, ५.८ (१८.१ टक्के) फळे, ६.९ (१३ टक्के) भाज्यांची नासाडी होते. सध्या केवळ १० टक्के खाद्य पदार्थांवर प्रक्रिया केली जाते, अशी माहिती सिफेट या संस्थेने दिली.नजीकच्या काही वर्षांत देशात अशा प्रकारचे पार्क सुरू झाल्यानंतर कृषी मालाला चांगला भाव मिळून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. 

‘२०२५ मध्ये ६५ लाख कोटी रुपये खर्च होतील खाण्यापिण्यावर’ : देशात खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील खर्च सध्या २४ लाख कोटी रुपये आहे. २०२५ मध्ये तो ६५ लाख कोटींवर पोहोचेल. त्यामुळे फूड चेनमध्ये देश-विदेशातील कंपन्यांसोबत काम करण्याची मोठी संधी आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. राजधानीत तीन दिवसीय वर्ल्ड फूड इंडियामध्ये रविवारी बोलत होते.
 
लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी
- प्रत्येक मेगा फूड पार्कमध्ये सरासरी ७-८ हजार टन कोल्ड स्टोरेज क्षमता असेल. अशा प्रकारे सर्व ४२ पार्कमध्ये कोल्ड स्टोरेज क्षमता २.९४ लाख टन व वेअरहाूस क्षमता ४.२ लाख टन होईल.
- एका पार्कमध्ये २० युनिट असतील. प्रत्येक युनिटमध्ये किमान १५ जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. एकूण ४२ पार्क सुरू झाल्यानंतर सुमारे १३ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. त्याशिवाय २० हजार लोकांना अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार मिळेल.
- पार्कसाठी किमान ५० एकर क्षेत्र आवश्यक. पायाभूत सुविधांवर ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...