आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mehdi's 60 Percent Followers Are Non Muslim Home Minister Rajnathsingh

आयएसच्या मेहदीचे ६० टक्के फॉलोअर्स परदेशी मुस्लिमेतर - गृहमंत्री राजनाथसिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचे टि्वटर अकाऊंट बंगळुरूहून चालवल्याचा आरोप असलेल्या मेहदी मसरूर बिस्वास याचे ६० टक्के टि्वटर फॉलोअर्स भारत वगळता बाहेर देशातील मुस्लिमेत्तर होते. उर्वरित जे मुस्लिम फॉलोअर्स होते त्यातील बहुतांश पाश्चिमात्य राष्ट्रातील, विशेषत: ब्रिटनमधील होते. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

या प्रकरणी राजनाथ यांनी स्वत:हून सभागृहात ही माहिती दिली. २१ वर्षीय मेहदीला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत त्याच्या कारवाया आयएसधार्जिनी माहिती पोस्ट करण्यापुरत्याच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयएसमध्ये भरती होण्यासाठी आपण कुणालाही मदत केली नसल्याचे मेहदीचे म्हणणे आहे.

कॉलेज जीवनात इटरनेटवर सिरिया, इराक व अफगाणिस्तानातील घडामोडी मेहदी आवडीने वाचत, पाहत असे. २००९ पासून तो सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अ‍ॅक्टिव्ह आहे. कालांतराने विविध सोशल साईट्सवर त्याने संवाद सुरू केला. मात्र, आयएसमध्ये भरती होण्यासाठी आपण कोणालाही प्रोत्साहित केले नाही िकंवा अशा भरतीसाठी प्रयत्न केले नाहीत, असा मेहदीचा दावा आहे. मेहदीने फक्त आयएससंबंधी मजकूर ट्विटरवर पोस्ट करून इतरांपर्यंत पोहचवला, असे राजनाथ यांनी नमूद केले.

राज्यसभेमध्ये गांेधळ
धर्मांतराच्या मुद्द्यावर राज्यसभेत विरोधकांनी पुन्हा गदारोळ केल्याने सोमवारी कामकाज होऊ शकले नाही. धर्मांतराची कृती होऊ नये यासाठी पंतप्रधानांनी आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सर्वांत आधी धर्मांतराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. ती मान्य झाल्यानंतर पंतप्रधानांनी चर्चेला उत्तर देण्याची मागणी लावून धरण्यात आली. गृहमंत्र्यांकडून उत्तर मिळेल, असे जाहीर केल्यानंतर विरोधक आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी ३.०० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याआधी चार वेळा कामकाज स्थगित करण्यात आले होते. विरोधकांनी आग्र्यात झालेल्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. हा विषय गंभीर असून धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीला ठेच पोहोचवणारे आहे, असे काँग्रेस, डावे व तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सांगितले. "प्रधानमंत्री जवाब दो, जवाब दो' या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.

मदतीसाठी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक!
गारपीटग्रस्तांना तातडिने मदत करावी, बेजोरगारांसाठी लघु उद्योग सुरू करावेत, कर्ज वसुलीसाठी बॅँकांचा अतिरेकीपणा थांबवावा, मुंबईतील जीर्ण इमारतीतील लोकांचे पुनर्वसन करावे आणि सेवाग्रामच्या बापू कुटीचे संरक्षण करावे, या मागण्या लावून धरत लोकसभेत महाराष्ट्रातील खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली.

राज्यात दुष्काळ असूनही कोणतीही ठोस मदत केंद्राने केली नाही. गारपीटीमध्येही हजारो हेक्टर फळबागा धोक्यात आल्या. यासाठी केंद्राने तातडिने मदत करावी, अशी मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शून्य प्रहरात केली. ही मदत मागताना त्या पोटतिडकीने मराठीतूनच बोलल्या. प्रादेशिक भाषेतून बोलण्यासाठी आधी लोकसभा सचिवालयाला तशी सूचना द्यायची असते. त्यानुसार अनुवादक त्याचे भाषांतर इंग्रजी व हिंदीतून करतो. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही या मुद्याचे समर्थन कोणास करायचे आहे का, असे मराठीतच विचारले. वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या बापू कुटीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, या भागात उद्योगांमुळे प्रदुषण वाढले आहे.शिवाय बापू कुटी जीर्ण होत असल्याने याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. केंद्राने पुढाकार घेऊन गांधीजींचा हा आश्रम वाचवावा. भावना गवळी यांनी भावनेच्या भरात विदर्भात म्हणण्याऐवजी ‘विदर्भ राज्यात’ बेकारांसाठी उद्योग उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी केली.