आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीपातींचे गाठोडे जमिनीत गाडून टाका: \'दलित विरुद्ध दलित\' मुद्द्यावर बोलल्या मीरा कुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरा कुमार यांनी अनेक महत्त्वाची भूषवलेली आहेत. - Divya Marathi
मीरा कुमार यांनी अनेक महत्त्वाची भूषवलेली आहेत.
नवी दिल्ली - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार बुधवारी नामनिर्देशन दाखल करू शकतात. याआधी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत मीरा म्हणाल्या की, ''17 पक्षांनी मला उमेदवार केले आहे. सगळ्यांनी आपल्या आतला आवाज ऐकला पाहिजे. जातीपातीच्या गोष्टी जमिनीत गाडून देशाला पुढे नेले पाहिजे.''
- राष्ट्रपती निवडणुकीला दलित विरुद्ध दलित अशा स्वरूपात पाहण्याच्या प्रश्नावर मीरा कुमार बोलत होत्या.
- तथापि, मीरा कुमार या दलित वर्गातीलच आहेत. दुसरीकडे, एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंदही दलित आहेत. त्यांनी 23 जून रोजी नामनिर्देशन दाखल केलेले आहे. एनडीए सध्या मतांच्या टक्केवारीच्या तुलनेत यूपीएपेक्षा मजबूत आहे. कोविंद यांच्या नावाच्या घोषणेनंतर जेडीयू आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने इलेक्टोरेल कॉलेजमध्ये एनडीएची मते 61.89 टक्के झाली आहेत. 
 
विरोधी पक्षांतील एकी समान विचारधारेवर आधारित...
- मीरा कुमार म्हणाल्या, मागच्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींबद्दल तुम्ही सर्व जाणताच. 17 मुख्य विरोधी पक्षांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वात सर्वसंमतीने माझी उमेदवार म्हणून निवड केली आहे. विरोधी पक्षांतील एकी एका समान विचारधारेवर आधारित आहे.
- ''गरिबीचे निर्मूलन, जातिव्यवस्थेचा विनाश, वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अशी ही विचारधारा आहे. मी निर्वाचक मंडळाच्या सर्व सदस्यांना पत्र लिहिले आहे. त्यांचा पाठिंबाही मागितला आहे. त्यांना आवाहन केले की, त्यांच्यासमोर ही मोठी संधी आहे, इतर सर्व बाबींवर लक्ष हटवून आपल्या आतला आवाजावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.''
बातम्या आणखी आहेत...