आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांवर सवलतींचा वर्षाव; कपडे धुण्यासाठी दैनंदिन 600 रुपये भत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 16 व्या लोकसभेच्या स्थापनेबरोबरच जूनच्या अखेरीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. निवडून आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्या दिवसापासून 543 खासदारांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे.

खासदारांना मिळणारे वेतन आणि इतर सोयी-सुविधा, भत्त्यांकडे पाहिले तर चकित करणारे वास्तव समोर येते. केवळ घरातील पडदे व इतर कपडे धुण्यासाठी खासदारांना 50 हजार रुपये मिळतात. तीन महिन्याला (अर्थात दररोज सुमारे 600 रुपये ) ही रक्कम दिली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

खासदारांना या सुविधा आणि भत्तेही
० लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला संसदेच्या कामकाजात पूर्णवेळ सहभागी झाल्याबद्दल प्रतिमहिना 50 हजार रुपये दिले जातात.
०संसदेच्या रजिस्टरमध्ये दररोज स्वाक्षरी करणार्‍या खासदाराला दिवसाच्या भत्त्यापोटी 2000 रुपये दिले जातात.
० आपल्या लोकसभा मतदारसंघात राहणार्‍या खासदारांनादेखील दर महिन्याला 45 हजार रुपये भत्ता दिला जातो.
०संसदेच्या स्थानिक विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्याला आपल्या कार्यक्षेत्रातील विकास कार्यासाठी 5 कोटी रुपये मिळतात. त्यासाठी ते स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कार्य राबवू शकतात.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, प्रवासी सुविधा...