आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी पेन्शनचा खासदारांना हक्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेचा एखादा माजी सदस्य माजी आमदार, नगरसेवक म्हणून निवृत्तीवेतन घेत असला तरी त्याला दुहेरी निवृत्तीवेतनाचा अधिकार आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यसभेच्या सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार वेतन व भत्ते कायदा-१९५४ नुसार माजी खासदार व विद्यमान संसद सदस्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. या कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्यास इतर कोणतेही निवृत्तीवेतन मिळत असले तरी माजी खासदार म्हणून तो निवृत्तीवेतनास पात्र ठरतो.वेतन-भत्ते निश्चित करणा-या विभागात एखादा माजी खासदार ते माजी आमदार किंवा नगरसेवक आहे किंवा नाही याची नोंद केली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अर्थ मंत्रालयाच्या विनिमय विभागाशी संबंधित केंद्रीय पेन्शन अकाऊंटिंग कार्यालयातही याबाबत कोणत्याही नोंदी नाहीत. खासदारांना दिला जाणारा स्थानिक क्षेत्र विकास योजना बंद केली जाणार नाही.