नवी दिल्ली - पर्यावरण दिनाचे अाैचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील वन विभागाच्या ७० एकर जमिनीवर चार हजार झाडे लावण्याचा संकल्प केला अाहे. लाेकसहभागातून हा उपक्रम चालविला जाणार असून त्याला स्मृती उद्यानाचे स्वरूप दिले जाणार अाहे. शनिवारपासून पुण्यात याची सुरुवात केली जाणार अाहे.
शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिवस अाहे. यानिमित्त देशभर विविध ठिकाणी वृक्षाराेपणाचे धडक कार्यक्रम राबविले जातील. पंतप्रधान नरेंद्र माेदी त्यांच्या ७ रेसकाेर्स या निवासस्थानी राेपटे लावून या अभियानाची सुरुवात करतील. विराट काेहली अाणि सुशीलकुमार हेही दिल्लीतील पर्यावरण भवनात वृक्षाराेपणाच्या कार्यक्रमात सहभागी हाेत अाहेत.मुंबईत सायंकाळी होणा-या वृक्षाराेपणाच्या कार्यक्रमा प्रकाश जावडेकर, विनाेद तावडे, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, राेहित शर्मा हे सहभागी होणार आहेत.
पुण्यामध्ये वृक्षाराेपणाचे अभिनव अभियान राबविले जात अाहे. यात निधीही लाेकांकडून गाेळा हाेणार अाहे. काेणाला अापल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने झाड लावायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकी दाेन हजार रुपये द्यावे लागणार अाहे. या झाडाला नंतर त्या व्यक्तीच्या नावाचा फलक लावण्यात येणार अाहे. पुणेकरांनी याला प्रतिसाद दिल्यास ८० लाख रुपये जमा हाेतील.
अाणि झाडांची निगा राखण्यासाठी मदत हाेईल. तर येणा-या काळात स्मृती उद्यानाला वेगळे महत्व प्राप्त हाेईल असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला.