आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Men\'s Sex Drive Is Weakening In All Over The World

शरीर संबंधात महिलांच्या तुलनेत पुरुष मागे, जगभर \'सेक्स ड्राईव्ह\'ची समस्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगभरातील पुरुष सेक्सच्या बाबतीत महिलांच्या तुलनेत कमजोर पडू लागल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. हे फक्त एखाद्या देशातच घडते आहे असे नव्हे तर जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत हा नवा ट्रेंड पाहणीत आढळून आला. पुरुषाची सेक्स ड्राईव्ह (शरीर संबंधांची इच्छा नसणे किंवा शारीरिक भूक) कमी होत चालली आहे. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, प्रत्येक पुरुष कायम सेक्सबाबत विचार करीत असतो. तसेच प्रेम करण्यास व स्वीकारण्यास कधीही तयार असतो. मात्र नुकत्याच केलेल्या ऑनलाईन पाहणीत आढळून आले आहे की, 62 टक्के पुरुष आपल्या महिला पार्टनरच्या तुलनेत सेक्स करण्याबाबत मागे राहतात. ही पाहणी यूकेमेडिक्स डॉट कॉम फार्मसीने केली आहे. या पाहणीतील प्रत्येक तिस-या पुरुषाने सांगितले की, पहिल्यापेक्षा त्याची दिवसेंदिवस सेक्स ड्राईव्ह कमी होत चालली आहे.

सेक्सबाबत भारतात 2011 मध्ये इंडिया टुडे - नेल्सन यांच्या संयुक्त पाहणीतील निष्कर्षावर खूप वाद झाला होता. त्या संयुक्त पाहणीत देशातील छोट्या-मोठ्या शहराचा समावेश होता. त्यात असे आढळून आले होते की, एकृतृतीआंश पुरुष आपल्या महिला पार्टनरसोबत सेक्स न करण्याबाबत काहीतरी कारणे शोधतात व सेक्स संबध टाळतात. त्यानुसार, गेल्या आठ वर्षापासून करीत असलेल्या सेक्स सर्व्हेनंतर हे दिसून आले होते की, सेक्समध्ये व शारीरिक संबंधाबाबत समाधान व्यक्त करण्याचा आकडा 27 टक्क्यांनी घसरला, घटला आहे. दुस-या एका पाहणीत आढळून आले होते की, प्रत्येक चार पुरुषांपैकी एक जण सेक्सच करीत नाही. 55 वर्षांच्या पुढील वयोगटातील 42 टक्के पुरुषांना सेक्सबाबत समस्या असल्याचे आढळून आले. यातील 25 टक्के पुरुषांनी सांगितले की, सेक्स करण्यासाठी शारीरिकदृष्या मी फीट नाही व त्यामुळे सेक्स करण्याचा प्रयत्न केला तरी हाती निराशाच येते.

ब्रिटनमधील कामसंबंधातील विशेषतज्ञ डॉ. डेविड एडवर्ड्स यांच्या माहितीनुसार, सेक्स ड्राईव्ह कमी झाल्यास एका व्यक्तीचे सामान्य जीवन व त्याचे नातेसंबंध धोकादायक स्थितीत पोहचतात. डेविड म्हणतात, माझ्याकडे अनेक पुरुष सेक्सच्या समस्येमुळे येतात. नुकतेच माझ्याकडे एक केस आली होती. ज्यात संबंधित पुरुषाला सेक्समध्ये रस नसल्याने त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला. संबंधित महिला त्याला मागील 12 वर्षापासून डॉक्टरांची मदत घेण्यास सांगत होती. मात्र त्याने पत्नीचे ऐकले नाही अखेर ती त्याला सोडून गेल्यानंतर त्याला जाग आली.

दरम्यान, जगभरातील पुरुषांचे दिवस आता भरत आल्याचे एका संशोधनात पुढे आले आहे. ऑस्‍ट्रेलि‍यातील एका महिला वैज्ञानि‍काने दावा केला आहे की, पुरुषांची प्रजात जास्त दिवस या जगात टिकणार नाही. येत्या 50 लाख वर्षांत पुरुष प्रजात पृथ्‍वीवरुन नष्ट होईल. या महि‍ला वैज्ञानि‍काने हा ही दावा हकेला आहे की, पुरुष प्रजात नष्ट होण्याला सुरुवात झाली आहे. ( सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा, जगभरातील पुरुष होत आहेत 'कमजोर'; पृथ्वीवरुन नष्ट होणार पुरुष जमात!)

सेक्स ड्राईव्हची समस्याची कशामुळे वाचा, पुढे क्लिक करा...