नवी दिल्ली- सोने निरंतर स्वस्त होत आहे. सोन्याच्या किमती 25 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. या परिस्थितीत सोने विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे. पण जेव्हा सोने स्वस्त होते तेव्हा बनावट सोन्याचा धंदा तेजीत असतो. सोने विकत घेताना त्याची शुद्धता तपासणे अतिशय आवश्यक असते. आम्ही आपल्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत, यांच्या मदतीने तुम्हीच सोन्याची शुद्धता तपासू शकता.
24 कॅरेट गोल्डपासून तयार होत नाही दागिने
सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.
हॉलमार्क नंबरवर शुद्धता
सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.
शुद्धतेनुसार असतात कॅरेट
24 कॅरेट- 99.9
23 कॅरेट--95.8
22 कॅरेट--91.6
21 कॅरेट--87.5
18 कॅरेट--75.0
17 कॅरेट--70.8
14 कॅरेट--58.5
9 कॅरेट--37.5
अशी ठरवली जाते सोन्याची किंमत
1) कॅरेट गोल्डचा अर्थ असतो 1/24 टक्के सोने. दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 ला 24 ने भागून 100 ने गुणाकार करा.
(22/24)x100 = 91.66 म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर टीव्ही किंवा प्रसार माध्यमांमध्ये 25 हजार रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत सोने विकत घेण्यासाठी गेलात तर (25000/24)x22= 22916 रुपये दर लागेल. कारण दागिने 22 कॅरेट सोन्यापासून तयार होतात. यात मजुरीही जोडली जाते. अशा वेळी किंमत आणखी वाढते.
2. 18 कॅरेट सोन्याची किंमत (25000/24)x18 =18750 रुपये प्रति तोळा येते. ऑफरमध्ये शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, हॉलमार्क कसा ओळखला जातो.... सोन्यात कशी केली जाते भेसळ...
(फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरले आहेत.)