आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात रोजगाराची हमी केवळ 4७ दिवसांची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून जनतेला 100 दिवसांचा रोजगार मिळवून देण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याची फुशारकी मारून केंद्र सरकारचे पुरस्कार लाटणारे राज्य सरकार आता केंद्र सरकारच्या माहितीमुळे उघडे पडले आहे. महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत एका कुटुंबाला केवळ 40 ते 54 दिवसांपर्यंतच रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. वर्षाला एका कुटुंबाला सरासरी रोजगार हा केवळ 4७ दिवस उपलब्ध झाला आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘मनरेगा’मध्ये महाराष्ट्राची प्रगती ही देशात नेहमीच अव्वल असल्याचे सांगितले. या योजनेसाठी राज्याला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. दीड महिन्यांपूर्वीच योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याला मनरेगाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मनरेगाच्या माध्यमातून एका कुटुंबाला किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे नियम आहेत. डॉ. नितीन राऊत यांनीही महाराष्ट्रातील जनतेला 100 दिवस रोजगार देण्यात रोजगार हमी विभाग यशस्वी झाल्याची माहिती दिली होती. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार. मनरेगा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2010-11 या वर्षी प्रतिकुटुंबाला 44 दिवस रोजगार 2011-12 मध्ये 51 दिवस रोजगार 2012-13 मध्ये 54 दिवस रोजगार आणि 2013-14 मध्ये केवळ 40 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारतर्फे 2010-11 या वर्षी 35८ कोटी 11 लाख ९७ हजार, 2011-12 या वर्षी 1६0 कोटी 15 लाख, 2012-13 या वर्षी 21 कोटी, तर 2013-14 या वर्षी ९55 कोटी ८5 लाख 2९ हजार रुपये खर्च करण्यात आले.

असा झाला रोजगार उपलब्ध
महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 2011-12 या वर्षी 2 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. (प्रत्येक दिवसाचा एक रोजगार याप्रमाणे) त्यापैकी 44 लाख अनुसूचित जातीचे, 51 लाख 12 हजार कामगार अनुसूचित जमातीचे होते, तर ६७ लाख ७७ हजार महिलांना रोजगार मिळाला. . 2011-12 मध्ये ७ कोटी ७2 लाख 2 हजार व्यक्तींना रोजगार दिला त्यात ६0 लाख 5९ हजार अनुसूचित जातीचे, 51 लाख 12 हजार अनुसूचित जमातीचे आणि 3 कोटी 54 लाख 54 हजार महिला आहते. 2012-13 मधील ८ कोटी ७1 लाख ७4 हजार पैकी ७4 लाख ७0 हजार अनुसूचित जातीचे, 1 कोटी 4६ लाख 12 हजार अनुसूचित जमातीचे आणि 3 कोटी ८८ लाख 32 हजार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यापैकी 34 लाख ७2 हजार अनुसूचित जातीचे ६७ लाख 1६ हजार अनुसूचित जमातीच्या आणि 1 कोटी 5७ लाख ७1 हजार महिलांचा समावेश आहे.