आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MHA Orders Shoot Anything Suspicious Flying Over Delhi

ISIS च्या निशाण्यावर दिल्ली ? राष्ट्रपती भवन, 7 RCR होऊ शकते लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीवर आयएसआयएस आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांकडून हवाई हल्ला होण्याचा धोका आहे.

गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, हल्ल्याच्या शक्यतेने गृहमंत्रालयात काही दिवसांपूर्वी एक उच्चस्तरिय बैठक झाली. त्यात हल्ला होऊ शकतो अशा दिल्लीतील विविध 15 ठिकाणांची यादी करण्यात आली. दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच आकाशात संशयित ड्रोन उडताना दिसले तर त्याला तत्काळ उडवण्याचे आदेश दिण्यात आले.

कोणत्या ठिकाणी होऊ शकतो हल्ला
संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती निवासस्थान, पंतप्रधान आणि गृहमंत्री निवासस्थान, इंडिया गेट परिसर, सीजीओ कॉम्पलॅक्स (येथे सीबीआय, सीआयएसएफ आणि बीएसएफ कार्यालय आहे.), दिल्ली विधानसभा, सुप्रीम कोर्ट, प्रमुख मंदिरे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ.

UAS आणि ड्रोनच्या सहाय्याने होऊ शकतो हल्ला
गृहमंत्रालयाने शंका व्यक्त केली आहे, की मानवरहित एअर सिस्टिम (यू एएस) आणि ड्रोनद्वारे दहशतवादी दिल्लीला लक्ष्य करु शकतात. राजधानीवरील धोका लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाला अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.