आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michelle Obama In Dress Of Bibhu Mohapatra In New Delhi

PHOTOS : भारतीय डिझायनरने तयार केलेला ड्रेस घालून आल्या मिशेल ओबामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय वंशाचे डिझायनर बिभू महापात्रा यांनी डिझाइन केलेला ड्रेस घालून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा भारतात दाखल झाल्या आहेत. अशी माहिती बिभू महापात्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
आज (रविवारी) सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचे नवी दिल्लीत आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
दरम्यान, विमानातून बाहेर पडताना मिसेस ओबामा यांनी परिधान केलेल्या ड्रेसची डिझाईन ही भारतीय वंशाचे डिझायनर बिभू महापात्रा यांनी तयार केलेली आहे. मिशेल यांचे भारतात आगमन झाल्यानंतर महापात्रा यांनी ही महिती ट्विटच्या माध्यमातून सकाळी दिली.
ओडिशाचे राहणारे आहे बिभू
डिझायनर बिभू हे ओडिशातील राउरकिलाचे रहिवासी असून न्यूयॉर्कमधील फॅशनच्या दुनियेतील प्रसिद्ध नाव आहे. मिशेल यांचे ज्यावेळी नवी दिल्ली विमानतळावर आगमन झाले त्यावेळी बिभू यांनी ट्विट केले की, मिशेल यांनी जो ड्रेस परिधान केला आहे तो माझ्या स्प्रिंग 15 कलेक्शनपैकी एक आहे.
मिशेल यांनी याआधी देखील घातले आहेत बिभू यांच्या डिझाइनचे कपडे
याआधी देखील मिशेल ओबामा या बिभू महापात्रा यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसेसमध्ये दिसून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ब्लॅक कॅक्स फाउंडेशनच्या वार्षिक फोनिक्स अवार्ड समारंभात देखील मिशेल यांनी बिभू यांनी डिझाइन केलेला ग्राउन परिधान केला होता.

2012 मध्ये देखील परिधान केले बिभू यांनी डिझाइन केलेले कपडे
ओडिशातील एका मध्यम वर्गातील कुंटूंबात जन्माला आलेल्या बिभू यांनी डिझाइन केलेले कपडे मिशेल यांनी 2012 मध्ये लेनो शो दरम्यान परिधान केले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित छायाचित्रे