आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Microsoft Launches Guardian Mobile App To Protect Women

संकटकाळात महिलांच्‍या मदतीसाठी मायक्रोसॉफ्टने लॉंच केले \'गार्डियन\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍लीत झालेल्‍या सामुहिक बलात्‍कराच्‍या घटनेनंतर महिलांच्‍या सुरक्षेसाठी व्‍यापक स्‍तरावर उपाययोजना करण्‍याची मागणी देशभरातून होत आहे. यासंदर्भात काही मोबाईल अप्लिकेशन्‍स तयार करण्‍यात आले होते. आता जगातील आघाडीची कंपनी सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने उचलले आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाने 'गार्डियन' या नावाने एक अप्लिकेशन तयार केले आहे. हे अप्लिकेशन विंडोज फोन वापरणा-यांसाठी उपलब्‍ध आहे. त्‍यात महत्त्वाचे 'ट्रॅक मी' नावाचे एक फिचर देण्‍यात आले आहे. या फिचरमुळे फोन वापरणा-याचे लोकेशन मित्र आणि कुटुंबियांना कळू शकते.

संकटाच्‍यावेळी फोन वापरणा-याला फक्त एसओएस अलर्ट बटन दाबावे लागेल. त्‍यानंतर पोलिस, रुग्‍णालय तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना एक अलर्ट पाठविण्‍यात येईल. वापरकर्त्‍याचे लोकेशन पोलिसांना सहज कळणार असल्‍यामुळे लवकरात लवकर मदत पोहोचविणे शक्‍य होणार आहे. हे अप्लिकेशन 6 महिन्‍यांमध्‍ये तयार करण्‍यात आले आहे.