आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक ISI चीफ बडबडले - \'भारताच्या दिल्ली-मुंबईचे हिरोशिमा-नागासाकी करु\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद - पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय)चे माजी प्रमुख आणि पाकिस्तान लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल हामिद गुल यांनी भारताला धमकी दिली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की जर भारत ठिकाण्यावर आला नाही तर आम्ही दिल्ली-मुंबईला आजचे हिरोशिमा आणि नागासाकी करुन टाकू. उल्लेखनिय बाब म्हणजे, दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याला आज 70 वर्षे होत आहेत.
हे पण वाचा - जिवंत पकडलेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक, चौकशी सुरु- गृहमंत्री
जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी पकडण्याला म्हटले भारताची चाल
जम्मू-काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यासोबत आमचा काही संबंध नाही, असे सांगत पाकिस्तानने आरोप फेटाळले आहेत. उस्मान उर्फ कासिम खान सीमेपलिकडून भारतात आला होता. त्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयातील एक अधिकारी म्हणाले, 'होय, मी ऐकले आहे. काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. पण मला वाटते की पाकिस्तानची नाचक्की करण्यासाठीची ती भारताची चाल आहे.'
जम्मूमधील उधमपूर येथे बीएसएफच्या बसवर तीन दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला होता. त्यातील एकाला स्थानिकांनी पकडले आणि लष्कराच्या स्वाधीन केले आहे.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देणे टाळले
उधमपूरमध्ये पकडण्यात आलेला दहशतवादी उस्मानने तो पाकिस्तानातील फैसलाबादचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात सांगितले आहे. फैसलाबाद इस्लामाबादपासून 250 किलोमीटर अंतरावर आहे. उस्मानच्या अटकेवर पाकच्या इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन आणि परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देण्याचे टाळले आहे. पाक परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाच्या गुरुवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत हा मुद्दा असेल किंवा नाही यावर मौन बाळगण्यात आले आहे.

हामिद गुल यांच्या प्रमाणेच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी देखील वक्तव्य केले होते. आपण अणुबॉम्ब काय शब-ए-बारात साठी राखून ठेवला आहे का? असा सवाल मुशर्रफ यांनी लष्कराला केला होता.

कोणाकडे किती अणुबॉम्ब
देशअणुबॉम्ब
भारत90-100
पाकिस्तान100-110
चीन250
अमेरिका7300
रशिया8000
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...