आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Militants Shot Her Nine Times, Warned Villagers Not To Touch Her Body

बोडो बंडखोरांनी केली तरुणीची हत्या, पाठ, छाती, तोंडात झाडल्या नऊ गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : बोडो बंडखोरांनी हत्या केलेली तरुणी प्रिया बसुमतारी.

नवी दिल्ली - बोडो बंडखोरांनी आसामच्या चिरंग जिल्ह्यात 16 वर्षीय प्रिया बसुमतारी या तरुणीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांची खबरी असल्याचा आरोप करत प्रियाची हत्या करण्यात आली आहे. प्रियाच्या मृतदेहाला हात लावल्यास त्यांचीही तीच अवस्था करण्यात येईल, असा इशारा बंडखोरांनी परत जाताना गावक-यांना दिला होता. पोलिसांनी घटनेच्या 24 तासांनतर प्रियाचे शव ताब्यात घेतले.
भारत-भूतान सीमेच्या जवळ पश्चिम आसामच्या चिरंग जिल्ह्याच्या घनदाट जंगलात द्वीमुगुरी गावात राहणा-या प्रियाच्या आई निरोला यांनी सांगितले की, 20 ऑगस्टला त्या दुपारी मुलगी प्रियाबरोबर कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्या जेव्हा परत घरी आल्या, तेव्हा चार शस्त्रधारी तरुण त्यांना घरासमोर आढळून आले. त्यांच्यापैकी एकाने प्रियाला पकडले आणि तिचा मोबाइल हिसकावून घेत ती पोलिसांची खबरी असल्याचा आरोप लावला. त्यानंतर त्यांनी तिला मारहाण सुरू केली. प्रियाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या तरुणांनी तिच्या आईलाही मारहाण केली. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर काय झाले ते त्यांना समजलेच नाही.
प्रियाचे पडील निरोन यांना मात्र बंडखोरांनी त्यांच्या मुलीवर होणारा अत्याचार पाहण्यास भाग पाडले. बंडखोर निरोन आणि प्रियाला शेतात घेऊन गेले. याठिकाणी सर्व गावकरी एकत्र जमले होते. प्रियाला शिक्षा देणार असल्याचे ते म्हणाले होते. एका बंडखोराने बंदुकीच्या नळीने प्रियाच्या वडिलांचा चेहरा वर केला. आम्ही तुझ्या मुलीला कशी शिक्षा देतो हे स्वतः बघ असे ते म्हणाले. इतरही सगळे सर्वकाही शांतपणे पाहत होते. कोणीही काहीही बोलले नाही. बंडखोरांनी प्रियाच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. ती समोरच्या बाजुला पडू लागली तेव्हा एक बंडखोर समोर आला व त्याने प्रियाच्या छातीवर दोन गोळ्या झाडल्या. तिस-याने प्रियाच्या तोंडात बंदुक लावली व तोंडात गोळ्या झाडल्या. चौघांनी तिच्यावर नऊ गोळ्या झाडल्या. त्यानंतर सुमारे 24 तास प्रियाच्या शरिरातीन रक्त वाहत होते. 21 ऑगस्ट रोजी काही गावक-यांनी प्रियाचा मृतदेह घेऊन जाण्याची हिम्मत केली, त्यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

क्रौर्याचे गुन्हेगार?
नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या सोंगबिजीत गटावर प्रियाच्या हत्येचा आरोप आहे. याच गटाच्या पाच युवकांना पोलिसांनी 20 ऑगस्टला कंठस्नान घातले होते. बोडो बंडखोरांना त्यासाठी प्रियाला जबाबदार ठरवले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेनंतर उसळलेल्या जनक्षोभ....