आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत \'टीम मोदी\'मधील कोट्याधीश मंत्री; जाणून घ्या, कोणाकडे किती संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंगळवारी 19 नव्या मंत्र्यांची एन्ट्री झाली. मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या 19 मंत्र्यांकडे एकूण 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. मोदींच्या टीम मोदीमध्ये खासदार व ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर हे सर्वाधिक श्रीमंत आहे. ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर आले आहे.

उल्लेखनिय म्हणजे ज्यूनिअर मंत्र्यांपैकी चार दलित मंत्री कोट्यधीश आहेत. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्याकडे 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहे. कृष्णा राज यांच्याकडे दोन कोटी, रमेश जिगजिनाजी यांच्याकडे 9 कोटी तर फग्गन सिंह कुलस्ते व जसवंत भाभोर यांच्याकडे प्रत्येकी दोन-दोन कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

अकबर यांनी घेतला होता राजकारणातून संन्यास...
- हरियाणाचे राहाणारे एम.जे. अकबर हे 1989 ते 1991 या काळात लोकसभेचे खासदार होते.
- काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी बिहारमधील किशनगंजमधून निवडणूक लढवली होती. पण 1991 मध्ये अकबर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
- दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ते प्रवक्ता होते.
- 1991 मध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडून पुन्हा पत्रकारिता सुरु केली होती. 2014 मध्ये अकबर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

किती आहे एम.जे.अकबर यांची संपत्ती?
> रोख रक्कम, बॅंक, विमा, शेअर, दागिने- 4.67 कोटी रुपये.
> जमीन, प्लॉट व घर- 9 कोटी रुपये
> 2014-15 मधील उत्पन्न- 37 लाख रुपये

पत्नीच्या नावावर 21.43 कोटींची संपत्ती
> जमीन, प्लॉट व घर कोटी रुपये
> 2014-15 मधील उत्पन्न- 43 लाख रुपये

पुढील स्लाइडवर पाहा, मोदी टीममधील इतर मंत्र्याकडे किती आहे मालमत्ता...?

(टीप: सर्व मंत्र्यांच्या मालमत्तेविषयी माहिती ही निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे घेतली आहे.)


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...