आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीच्या अडचणींवर मात करण्यासाठी अर्थ मंत्रालयात “मिनी वॉर रूम’ तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्यासाठी अर्थ मंत्रालयात एक “मिनी वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. ही वॉर रूम अनेक फोन लाइन आणि कॉम्प्युटर सिस्टिमने जोडलेली आहे. त्याच बरोबर यामध्ये तांत्रिक सेवेसाठी युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

‘सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स (सीबीईसी) चे प्रमुख वनाजा एन. सरना यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी ही वॉर रूम काम करणार आहे. एक जुलै रोजी लागू होणाऱ्या या ऐतिहासिक कर प्रणाली संबंधित अडचणी किंवा शंकांचे निराकरण याद्वारे करण्यात येणार आहे. म्हणजेच “क्विक रिसोर्स सेंटर’ म्हणून ही वॉर रूम काम करेल.  

उद्या संसदेत लाँचिंग रिहर्सल 
३० जून रोजी मध्यरात्री मोठ्या सोहळ्यात जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात बुधवारी या कार्यक्रमाची रिहर्सल होणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रिहर्सल रात्री १० वाजता होणार असून, केंद्रीय मंत्री अनंत कुमार, राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि एस. एस. अहलुवालिया किंवा सचिव राजीव यादव यांच्या निगराणीखाली ही रिहर्सल होईल.
बातम्या आणखी आहेत...