नवी दिल्ली- केंद्रीय अल्पसंख्यक राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांना अंडरवर्ल्डने टार्गेट केले आहे. नकवी यांना गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डमधून धमकीचे फोन येत आहेत. दुबईहून हे फोन येत असून धमकी देणारा व्यक्ती स्वत:ला 'भाई' सांगत आहे.
दरम्यान, नकवी यांना 16 डिसेंबरला पहिल्यांदा धमकीचा फोन आला होता. नंतर त्यांना पोलिसांत औपचारिक तक्रार नोंदवली होती. तसेच गृहमंत्रालय आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांना एक गुप्त पत्र लिहून याबाबतची माहिती दिली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबईत सक्रीय असलेल्या एका दहशतवादी संघटनेचा म्होरक्याद्वारा नकवी यांना धमकीचे फोन येत आहे. नकवी आणि धमकी देणार्या व्यक्तीच्या संभाषणाची एक ध्वनीफीत तयार करण्यात आली असून ती पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे.