आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात वाढणार भारताची ताकद, सर्वात घातक युद्धपोत \'INS किलतान\'चा नौसेनेत समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संरक्षण मत्री निर्मला सीतारमण यांनी आयएनएस किलतानला भारतीय नौसेनेला समर्पित केले आहे. विशाखापट्टणममध्ये माजी नेव्हल कमांडमध्ये पोहोचून संरक्षण मंत्र्यांनी याची औपचारिकता पूर्ण केली. किलतान सर्वात घातक युद्धपोत असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धपोताने पाणबुड्यांना सहजरीत्या लक्ष्य केले जाऊ शकते.
 
अशी आहेत वैशिष्ट्ये
रिपोर्टनुसार, या युद्धपोताचे वजन 3800 टन आहे आणि हे 109 मीटर लांब आहे. यात चार डिझेल इंजिनचा अंतर्भाव आहे. आधुनिक हत्यार आणि सेन्सरनी युक्त युद्धपोत 45 किमी प्रति तास या वेगाने चालू शकते. यावर हेलिकॉप्टर लँडिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
- या युद्धपोतात रॉकेट लाँचरही लावण्यात आलेले आहे. यामुळे रासायनिक, जैविक तसेच अणुयुद्धाच्या परिस्थितीतही शत्रूशी मुकाबला केला जाऊ शकतो. नौसेनेच्या नेव्हल डिझाइन निदेशालयाच्या डिझाइनवर या युद्धपोताची निर्मिती झाली आहे. यात हायक्लास स्टील डीएमआर 249चा वापर करण्यात आला आहे.
 
नुकताच 'आयएनएस तरासा'चाही भारतीय नौसेनेत समावेश 
- किनारपट्टीच्या तसेच लगतच्या हद्दीची निगराणी व गस्त लक्षात घेऊन युद्धपोत 'आयएनएस तरासा'चाही काही आठवड्यांपूर्वीच भारतीय नौसेनेत समावेश करण्यात आला होता. आयएनएस तरासाचे मुख्य कार्य किनारपट्टी आणि लगतच्या परिसराची निगराणी व गस्तीसाठी मजबूती, उच्च गती आणि परिवर्तनशीलता आदी गुण लक्षात घेऊन निर्मिती करण्यात आली आहे. याआधीही दोन आयएनएस तारमुगली आणि आयएनएस टिहायूचा सन 2016 मध्ये भारतीय नौसेनेत समावेश झाला होता. सध्या ते विशाखापट्टणम येथे तैनात आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज
बातम्या आणखी आहेत...