आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाठवलेंना केबिन नाही अाणि सध्या कामही नाही!, राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवनियुक्त राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयाचे कॅबिनेटमंत्री थावरचंद गहलाेत यांनी अाठवलेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गहलाेत म्हणाले, ‘विजय सापला अाणि कृष्णपाल गुर्जर हे दाेन राज्यमंत्री माझ्या विभागात अाहेतच. अाठवलेंमुळे आणखी एकाची भर पडली अाहे. अाठवलेंना बसायला केबिन उपलब्ध नसल्याने सध्या मी माझ्या शेजारी बसवून त्यांनी पदभार स्वीकारला असे जाहीर करताे.’ अाठवलेंवर काेणती जबाबदारी साेपविणार अाहात? या प्रश्नावर गहलाेत म्हणाले, ‘सापला यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग तर गुर्जर यांच्याकडे अपंग कल्याण अाणि इतर मागासवर्गीय विभाग देण्यात अाला अाहे.

अाठवलेंना काेणते काम द्यायचे ते पंतप्रधान कार्यालयातून सूचना अाल्यानंतरच स्पष्ट हाेइल.’ हे डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष असल्याने त्यासंदर्भातील कामे अाठवलेंकडे साेपवली जाऊ शकतात.
पुढील स्लाइडवर, डॉ. भामरेंनीही स्वीकारला पदभार..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


बातम्या आणखी आहेत...