आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठेरियांचे वक्तव्य भडक नाही, गृहमंत्री राजनाथ यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी आग्रा येथे प्रक्षोभक विधाने करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा विरोधी पक्षांनी केलेला आरोप फेटाळून कठेरिया यांना बडतर्फ करण्याची मागणीही गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी फेटाळून लावली. राज्यमंत्र्यांनी असे कोणतेही भडक वक्तव्य केले नसल्याचे सांगून माध्यमातून याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे राजनाथ यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले.
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरुण माहौर यांची गेल्या गुरुवारी आग्रा येथे हत्या झाली होती. अल्पसंख्याक समाजातील युवकांनी ही हत्या केल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी कठेरिया श्रद्धांजली सभेत सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी विशिष्ट समाजाविरुद्ध भडक विधाने करून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
कठेरियांवरील आरोप : हिंदुविरोधी कटाचाच ही हत्या एक भाग आहे. आपणही आता सावध व्हायला हवे. आज एक अरुण गमावला, उद्या कदाचित दुसऱ्या एखाद्या हिंदूचा जीव गमवावा
लागू नये म्हणून याविरुद्ध आपणही लढले पाहिजे, असे वक्तव्य श्रद्धांजली सभेत कठेरियांनी केल्याचा आरोप आहे.