आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Ramvilas Paswan Disappointed On Ministry's Cleaning, Divya Marathi

स्वच्छ भारत : गलिच्छ खोल्यावरून पासवान नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंत्री आपापल्या मंत्रालयाचा आढावा घेत आहे. अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी त्या दृष्टीने बुधवारी मंत्रालयातील विविध खोल्यांत फेरफटका मारला तेव्हा कॉरिडॉरमध्ये लटकलेल्या वायर व अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाने त्यांचे स्वागत झाले. मंत्रालयातील या अस्वच्छता व अव्यवस्थेवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अन्नमंत्री पासवान यांनी मंत्रालयातील विविध विभाग, ग्रंथालय,कँटीन व टॉयलेटची पाहणी केली. विविध खोल्यांतील अस्वच्छता, ग्रंथालयात पडलेल्या अस्ताव्यस्त पुस्तकांमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती अधिकृत पत्रकात देण्यात आली. त्यांनी खाली पडलेले कागद उचलून कचराकुंडीत टाकले तसेच ग्रंथालयाच्या नूतनीकरणाचे आदेशही दिले.

दोन तास स्वयंसेवा
पासवान यांनी अधिका-यांना एकत्र करून स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व पटवून सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत मोहिमेत आम्हा सर्वांना योगदान देण्याची संधी आहे. आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने दोन तास स्वयंसेवा करावी, असे आवाहन पासवान यांनी या वेळी केले.

कन्यारत्न प्राप्तीवर सीएम संदेश
त्रीधन वाचावे, मुलीच्या जन्मावर नाराज होऊ नये यासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पालकांना अभिनंदनाचा प्रिंटेड संदेश पाठवण्याचे ठरवले आहे. ११ ऑक्टोबरपासून जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या पालकांना हा संदेश दिला जाईल. अन्य रुग्णालयांतील अर्भकांसाठी बालदिनी, १४ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यामुळे त्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी चांगले वातावरण दिले पाहिजे, अशी अपेक्षा राजे यांनी या वेळी व्यक्त केली. सेव्ह गर्ल इंडिया चाइल्ड मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आरोग्यमंत्री राजेंद्र राठोर व अन्य वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.