आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Raosaheb Danve Is New Maharashtra BJP Chief

रावसाहेब दानवेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होईल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दानवे यांची नियुक्ती केली.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवल्याने प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. दानवे सध्या केंद्रात ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री आहेत. भोकरदनमधून दोन वेळा विधानसभेवर तर जालना मतदारसंघातून सलग चार वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत.