आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Minister Venkaiah Naidu Finds Attendance Is Poor

व्यंकय्या नायडू अधिकार्‍यांवर बरसले, 15 मिनिटे आधी न आल्यास गैरहजेरी लावा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय शहर विकास आणि संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांना सोमवारी एक आश्वर्याचा धक्का बसला. शहर विकास मंत्रालयात व्यंकेया नायडू यांनी अचानक भेट दिली. परंतु कार्यालयातील जवळपास 80 अधिकारी आपल्या कक्षात हजर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. व्यंकेया ज्याही कक्षात गेले त्या कक्षात संबंधित अधिकारी नव्हते.

व्यंकेया नायडू यांनी एकूण 80 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय कार्यालयीन वेळेच्या 15 मिनिटे आधीच हजेरी मस्टर बंद करण्‍याच्या सूचना दिल्या. तसेच जे अधिकारी आणि कर्मचारी याचे पालन करणार नाही, त्यांची गैरहजेरी लावण्याचेही आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. पुढील आठवड्यापासून अनुपस्थित कर्मचार्‍यांची दररोज यादी तयार केली जाणार आहे.

मंत्रालयात बसेल बायोमॅट्रिक अटेंडन्स यंत्रणा...
अधिकारी आणि कर्मचारी ठरलेल्या वेळेत कार्यालयात येत नसल्याचे व्यंकेया नायडू यांच्या लक्षात आले. नंतर नायडू यांना आपल्या दोन्ही मंत्रालयात बायोमॅट्रीक अटेंडन्स यंत्रणा बसवण्याचेही निर्देश दिले आहेत.
यापूर्वी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आपल्या सर्व मंत्र्यांना आपापल्या मंत्रालयात कामकाजात सुसुत्रता आणण्याचा सूचना दिल्या होत्या. नंतर पीएमओच्या अधिकार्‍यांना फाइल्सवर तत्काळ कार्यवाही करण्‍याच्या सूचना दिल्या होत्या.
तसेच माहिती व सूचना मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रालयाच्या कार्यालय अशाच प्रकारे अचानक भेट दिली होती. तब्बल चाळीस 40 कर्मचारी गैरहजर दिसून आले होते. जावडेकर यांनी सगळ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापण्याचे आदेश दिले होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नायडू यांच्या सरप्राइज व्हीजिटचे फोटो....
(फोटोः शहरी विकास मंत्रालय कार्यालयात अचानक भेटीदरम्यान व्यंकेया नायडू आणि अधिकारी)