नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व खांदेपालटानंतरच्या खातेवाटपात देशात सर्वाधिक प्रभावी राज्य म्हणून महाराष्ट्राची छाप पडली आहे. माेदींना केंद्रातील महत्वाची खाती मराठी मंत्र्यांवर अत्यंत विश्वासाने साेपवावी लागली. हेे दिल्लीत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ याचे निदर्शक मानले जात आहे.
माेदी सरकार स्थापन झाले तेव्हा अरुण जेटलींचा मंत्रिमंडळावर वरचष्मा दिसून येत हाेता. दिल्लीत नवख्या माेदींना स्थिरस्थावर हाेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी लागली. मात्र, मंगळवारच्या विस्तार व खातेपालटात माेदी-अमित शहांची दूरदृष्टी दिसून येत अाहे. स्मृती इराणींकडील मनुष्यबळ विकास मंत्रालय काढण्याचा त्यांचा निर्णय धाडसी म्हणावा लागेल. प्रकाश जावडेकरांकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय साेपविल्यामुळे देशाच्या शिक्षण विभागाची गाडी रुळावर अाणण्याची संधी महाराष्ट्राच्या वाट्याला चालून अाली अाहे. त्यामुळे राज्याचे महत्व वाढले आहे. खातेबदलानंतर माेदींच्या कॅबिनेटवर नजर टाकल्यास सरकारचा माेठा भार मराठी माणसांनी उचलल्याचे दिसून येते. नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व जहाजबांधणी हे महत्वाचे विभाग अाहेत. सुरेश प्रभूंकडे रेल्वे तर मनाेहर पर्रिकरांकडे संरक्षण खाते अाहे. नवे राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरेंकडे संरक्षण तर आठवलेंकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद दिले अाहे. हंसराज अहिर यांना गृह राज्यमंत्रिपद मिळाले उर्जा हा महत्वाचा विभाग पीयुष गाेयल यांच्या निमित्ताने महाराष्ट्राकडेच अाहे. शिवसेनेचे अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्याेग मंत्रालय अाहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)