आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ministers Insisting To Give Bharatratan To Atal Bihari Vajpeyee

अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्‍यात यावे या मागणीसाठी मंत्रीही सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व शास्त्रज्ञ सीएनआर राव यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर या बहुमानावरून राजकारण पेटले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान देण्याच्या मागणीने सोमवारी जोर धरला. भाजप, संयुक्त जनता दलासह केंद्रीय मंत्री पल्लम राजू आणि फारुख अब्दुल्ला यांनीही वाजपेयींना हा सन्मान मिळाला पाहिजे, असे सांगत भाजपच्या मागणीला पाठिंबा दिला.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वाजपेयींच्या नावाला पाठिंबा देताना 1977च्या काळात बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले कपरुरी ठाकूर व आपले गुरू राममनोहर लोहिया यांचाही पूर्वीच सन्मान व्हायला हवा होता, असे मत मांडले. मनुष्यबळ विकासमंत्री पल्लम राजू यांनी म्हटले आहे की, ‘वाजपेयी सर्वर्शेष्ठ नेते आहेत. त्यांना भारतरत्न मिळायला हवा.’ या मुद्दय़ावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी रविवारी वाजपेयींचा विचार का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यातच भाजपच्या क्रीडा शाखेचे संयोजक अशोक अग्रवाल यांनी हॉकीचे जादुगार ध्यानचंद यांचे नाव पुढे केले.
पुरस्कारांपेक्षा वाजपेयी किती तरी महान..
लोकसभेत पहिले भाषण ऐकून नेहरूंनी ‘तुम्ही पंतप्रधान व्हाल’ असे भाकीत ज्यांच्याविषयी वर्तवले ते वाजपेयी पुरस्कारांपेक्षा महान आहेत, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. दरम्यान, या सन्मानाचे गांभीर्य जपले जावे. गुजरात दंगलींनंतर मोदी सरकारविषयी वाजपेयींची भूमिका कळण्यापलीकडची आहे, असे माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.
सचिन फुकट खेळत नाही : तिवारी
‘ध्यानचंदना डावलून सचिनला भारतरत्न कसा दिला? सुविधा नसलेल्या काळात ध्यानचंद यांनी देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली. 1936 मध्ये त्यांनी हिटलरचा प्रस्ताव फेटाळला होता. सचिन काही फुकट खेळत नाही. खेळातून त्याने हजारो कोटी कमावले आहेत,’ अशा शब्दांत जदयूचे शिवानंद तिवारी यांनी नव्या वादाला तोंड फोडले.