नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी 14 ते 19 मे दरम्यान चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याची घोषणा केली. गेल्या वर्षी 26 मे रोजी पंतप्रधान बनल्यानंतर आतापर्यंत मोदींनी 15 देशांचे दौरे केले आहेत. या दरम्यान ते 40 दिवस परदेशांत राहिले.
मोदींचा यापूर्वीचा दौरा फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाचा होता. देशातही मोदींनी 50 पेक्षा अधिक दौरे केले आहेत. ते 12 वेळा महाराष्ट्र आणि आठ वेळा जम्मू काश्मिरला गेले होते. ज्या वेगात मोदी परराष्ट्र दौरे करत आहेत, ते पाहता ते मनमोहनसिंग यांना मागे टाकत सर्वाधिक परराष्ट्र दौरे करणारे पंतप्रधान ठरतील अशी शक्यता आहे.
मनमोहन सिंग यांनी 10 वर्षात केले त्यापेक्षा अर्धे दौरे मोदींनी केले एका वर्षात
मनमोहन सिंह 2004 पासून 2014 दरम्यान पंतप्रधान होते. त्यांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात 40 देशांचे एकूण 70 पेक्षा अधिक दौरे केले. त्यांना यूपीए-1 च्या कार्यकाळात 30 आणि यूपीए-2 च्या कार्यकाळात 40 परराष्ट्र दौरे केले. त्यावर 640 कोटी रुपयांचा खर्च झाला. यापैकी 15 दौरे अशा वेळी होते जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होते.
दुसरीकडे मोदींनी एका वर्षात 15 देशांचे दौरे केले आहेत. मोदींच्या परराष्ट्र दौऱ्याच्या यादीत आणखी 3 देश चीन-मंगोलिया-साऊथ कोरियाच्या दौऱ्यानंजर जोडले जातील. असाच वेग राहिला तर मोदी 5 वर्षांत सुमारे 90 हून अधिक देशांचे दौरे करतील.
तीन देशांच्या दौऱ्याचा कार्यक्रम
परराष्ट्र मंत्रालयाने ठरवल्यानुसार मोदी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात चीनला जातील. तेथे ते जियान, बीजिंग आणि शांघायला जातील. यादरम्यान पंतप्रधान चीनच्या प्रमुख नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसेच सांस्कृतिक आणि व्यावसायिक कार्यक्रमातही सहभागी होतील. चीनमध्ये भारतीय समुदायाद्वारे आयोजित एका कार्यक्रमातही ते सहभागी होतील.
मंगोलियाला जाणारे पहिलेच पंतप्रधान
दक्षिण कोरियात मोदी 18 आणि 19 मे रोजी असतील. ते सियोलमध्ये पार्क जियुन ह्ये आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करतील. चीन दौऱ्याबाबत मोदी बरेच उत्साही आहेत. त्यांनी सोमवारी चीनची सोशल नेटवर्किंग वेबसाइट वीबोदेखिल जॉइन केली होती. चीनच्या लोकांशी बोलायचे असल्याचे ते म्हणाले होते. एकाच दिवसांत त्यांचे 30 हजार फॉलोअर्स तयार झाले. अनेकांनी त्यांच्यावर वंशभेदी टीकाही केली.
जियांगमध्य होणार भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्याची सुरुवात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे गाव असलेल्या जियानहून होईल. ज्या प्रमाणे अहमदाबादेत जिनपिंग यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते, त्याचप्रमाणे मोदी यांचे याठिकाणी स्वागत केले जाणार असल्याचे वृत्त आहे. सप्टेंबरमध्ये चीनचे राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी भारत दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी मोदींनी अहमदाबादेत दोघांचे जोरदार स्वागत केले होते. मोदींनी त्यांना साबरमती आश्रमात नेले होते, त्याठिकाणी जिनपिंग आणि मोदींनी चरखाही चालवला होता.
भारत-चीन दरम्यानचे महत्त्वाचे मुद्दे
व्यापारातील वाढता तोटा - मोदींच्या दौऱ्यादरम्यान भारत चीनबरोबर वाढत्या व्यापार तोट्याबाबत आणि घरगुती उत्पादनांच्या बाजारपेठेबाबत चर्चा करेल. वाढत्या घाट्याबाबत तज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहे. चीनमधून भारतात गुंतवणूक आणण्याचाही प्रयत्न असेल.
सीमा वाद - भारत आणि चीन यांच्यात सुमारे 2 हजार किलोमीटर एवढा सीमा वाद आहे. त्याचा बहुतांश भाग अरुणाचल प्रदेशात येतो. भारताच्या मते मात्र वादग्रस्त भाग 4 हजार किलोमीटर एवढा आहे. विशेषतः यात अक्साई चीनचा समावेश आहे. त्यावर चीनने 1962 च्या युद्धात कब्जा केला होता.
व्हिएतनाममध्ये तेलाचा शोध - भारतीय तेल कंपन्या दक्षिण चीन सागरात व्हिएतनाममध्ये सागरी क्षेत्रात तेलाचा शोध घेत आहेत. दक्षिण चीन सागरात सीमेबाबद चीन आणि व्हिएतनाममध्ये अनेक वाद आहेत. भारताने त्यांच्या सीमेत उपकरणे लावल्याचेही चीनचे म्हणणे आहे. चीनने भारतीय कंपन्यांना नुकतीच धमकी दिली होती. भारत हा मुद्दा उचलण्याीच शक्यता आहे.
इंस्ट्रीयल कॉरिडोर - मोदी आणि जिंगपिंग भारत-बांग्लादेश-म्यानमार-चीन यांच्यात इंडस्ट्रीयल कॉरिडोर बनवण्याच्या सहमतीबाबतही चर्चा करू शकतात.