आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

31 डिसेंबरपर्यंत डिजिटल ट्रान्झॅक्शनवर सर्व्हिस चार्ज नाही; शेतकर्‍यांसाठी देणार 21000 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात रान पेटलं आहे. छोट्या नोटांचा तुडवडा जाणवत असल्याने सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडाली आहेे. दुसरीकडे, या निर्णयाविरुद्ध विरोधक एकवटले आहेत. यादरम्यान, सरकारने देशातील शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे, शेतकर्‍यांच्या सुविधासाठी सरकार लवकरच जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. ही रक्कम नाबार्ड उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी दिली.

यासोबतच देशात उद्‍भवलेली रुपयांची टंचाई लक्षात घेता, 31 डिसेंबरपर्यंत बँकेच्या डिजिटल ट्रान्झॅॅक्शनवर (DT) कोणताही सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नसल्याचेही दास यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, वैंकय्या नायडू, अर्थमंत्री अरुण जेटली आणि अनंत कुमार उपस्थित होते.

पुढील स्लाइडवर वाचा, केंद्रीय अर्थसचिवांनी बुधवारी केल्या या मोठ्या घोषणा...
बातम्या आणखी आहेत...