मुंबई - नियमानुसार निविदा प्रक्रिया न करता ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या कामांच्या आदेशांची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडेंचे हे खाते आहे. या मंत्रालयाने कोणतीही शहानिशा न करता तसेच निविदा न काढता २५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिल्याचा िवरोधी पक्षांचा आरोप आहे. दरम्यान, या मंजुरी प्रक्रियेत संबंधित मंत्र्यांची काहीही भूमिका नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लगेच स्पष्ट केले. या मंत्र्यांनाच अनियमिततेबाबत चौकशी करण्याचे करण्याची सूचना केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.