आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन प्रेमी जोडप्याला आधी विष दिले व नंतर तलवारीने केले तुकडे-तुकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर/अजनाला - जिल्ह्यातील राणी वाल गावात 15 वर्षांची गुरप्रीत कौर आणि 19 वर्षाचा लवप्रीत या अल्पवयीन जोडप्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दोघांना आधी विष देऊन नंतर त्यांचे तलवारीने तुकडे करण्यात आले. मुलीचे काका लखबीर, भाऊ जसविंदर आणि इतर 5 जणांनी या दोघांचे तुकडे करून त्यांना कालव्याच्या बादुला फेकून दिले. पोलिसांनी या प्रकरणी लखबीर व जसविंदरला अटक केली आहे.

इतर आरोपी हिरा सिंह, शीतू, बोबा, साबी आणि विक्का फरार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेहरसा गावात मुलगा आणि मुलीचे घर जवळ-जवळच आहे. रविवापी दोघे पळून गुज्जरपुरा येथे लवप्रीतच्या बहिणीच्या घरी आले होते. त्यामुळे कुटुंबीयांना गोंधळ घातला. तसेच पोलिस आल्यानंतर त्या दोघांचे लग्न लावून देण्याचे अश्वासन देत ते त्यांना घरी घेऊन गेले. पण बुधवारी रात्री उशीला मुलाच्या घरून त्याला घेऊन गेले व त्याची हत्या केली.

लवप्रीतचे तुकडे करायचे होते
आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, या दोघांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांना मुलाचे तुकडे तुकडे करायची इच्छा होती. पण दोघांचा आवाज कोणी ऐकू नये म्हणून त्यांनी त्या दोघांच्या तोंडाव विष ओतले. विषाचा परिणाम झाल्यानंतर दोघे तडफड करू लागले, त्यावेळी त्या दोघांवर तलवारीने वार केले. त्यानंतर निर्जन स्थळी त्यांचे मृतदेह फेकून देण्यात आले.