आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याकबहुल 90 जिल्ह्यांत पदवी कॉलेज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अल्पसंख्याक मुलांच्या उच्च शिक्षणातील कमी सहभागावर उपाय म्हणून सरकारने 90 अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यांमध्ये मॉडेल पदवी महाविद्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकार राज्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे.

अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान, मानवशास्त्र व वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अल्पसंख्याक शिक्षणाच्या राष्ट्रीय देखरेख समितीच्या स्थायी समितीने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला या संदर्भात नुकताच अहवाल सादर केला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील प्रवेशाची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या शिक्षणाची स्थिती समजण्यासाठी समितीने आपल्या अहवालात भर दिला. 2007-08 च्या आकडेवारीनुसार मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणातील उपस्थितीचे प्रमाण 8.7 टक्के नोंदले गेले. मुस्लिमेतर विद्यार्थ्यांचे हे प्रमाण 16.8 टक्के आहे. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी मदरशांमधील शिक्षकांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘नवोदय’च्या धर्तीवर
अल्पसंख्याकांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी 250 मॉडेल स्कूलपैकी किमान 10 टक्के विद्यालये धार्मिक अल्पसंख्याक वर्गांसाठी राखीव असावेत, असा प्रस्ताव आहे. याशिवाय 90 अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर दोन शाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.