आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याक समुदायात भीती नाही -मुख्तार नक्वी; वक्फ मंडळाच्या बैठकीत मांडली केंद्राची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याच्या घटनेवरून असुरक्षिततेचे वातावरण असल्याचा आरोप होत असला तरी त्यात तथ्य नाही. अल्पसंख्याक समाजात अशा प्रकारची कोणतीही भीती नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.  

समाजात विघातक गोष्टींना चिथावण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. परंतु केंद्र सरकार केवळ विकासाचा कार्यक्रम घेऊन पुढे चालत आहे. म्हणूनच अल्पसंख्याक समुदायात कोणत्याही प्रकारची भीती आहे, असा दावा करणे चुकीचे आहे. मला तरी तसे वाटत नाही. घटना छोटी असो किंवा मोठी, गुन्हा म्हणजे गुन्हा असतो. त्याची गय केली जाऊ शकत नाही, असे नक्वी म्हणाले. केंद्रीय वक्फ मंडळाच्या ७६ व्या बैठकीच्या निमित्ताने नक्वी गुरुवारी बोलत होते.  

ईदची खरेदी करून आपल्या गावी परतणाऱ्या १७ वर्षीय मुलाची हत्या झाली होती. ही घटना वल्लभगडमधील आहे. या घटनेच्या विरोधात बुधवारी देशभरात निदर्शने करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर नक्वी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात गर्दीने या मुलाची हत्या केली होती.  

सबलीकरणातून विश्वास निर्माण करू
अल्पसंख्याक मंत्रालयाच्या आगामी सबलीकरण कार्यक्रमावर नक्वी म्हणाले, माझे खाते सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक पातळीवर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन समुदायाच्या विकासावर भर देणार आहे. त्यांच्या सबलीकरणाच्या कार्यक्रमाची आखणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातून निश्चितपणे विकास व विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास नक्वी यांनी व्यक्त केला.  

मुख्यमंत्र्यांशी बोललो  
केंद्र सरकारसाठी समाजातील सर्व घटक समान आहेत. म्हणूनच अशा घटनांच्या विरोधात केंद्राने अतिशय तातडीने पावले उचलली आहेत. राजस्थान, हरियाणा व झारखंडमधील सरकारने विलंब न करता अशा लोकांच्या विरोधात कडक पावले उचलली. वैयक्तिक मीदेखील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.  
बातम्या आणखी आहेत...