आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडीझ हिट अँड रन :किशोरवयीन आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा, वडिलांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीसीटीवी फुटेजमध्ये सिद्धार्थला कर टक्कर मारताना दिसत आहे. - Divya Marathi
सीसीटीवी फुटेजमध्ये सिद्धार्थला कर टक्कर मारताना दिसत आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात मर्सिडीझने ३२ वर्षीय सिद्धार्थ शर्मा यास चिरडल्याच्या प्रकरणात १७ वर्षीय किशोरवयीनाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याचे स्वरूप हेतुत: कृती नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपीचे वडील मनोज अग्रवाल यांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. अगोदरही तो बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने दुर्घटनेस कारणीभूत ठरला होता.

मनोज अग्रवाल यांना कलम १०९ आणि ३०४ (२) नुसार अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही व्हिडिआे फुटेजचा तपास करण्यात आला. त्यात हा आरोपी भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसून आला होता. त्यामुळे पीडित सिद्धार्थला प्राण गमावावे लागले. गेल्या वर्षी वेगाने गाडी चालवणे आणि चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केल्याबद्दल तीन वेळा पकडला गेला होता. किशोरवयीन आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पहिल्यांदा पार्किंगचा दंड लागल्याची कल्पना असूनही मनोज अग्रवाल यांनी आपला मुलास गुन्हा करण्यास प्रवृत्त केले. वास्तविक त्याला रोखण्याची गरज होती.

साथीदारांसहआरोपी फरार :हिट अँड रनची घटना एप्रिल रोजीची आहे. सिद्धार्थ शर्मा सिव्हिल लाइन्सला रात्री नऊच्या सुमारास आपल्या घराजवळील मार्गावर होता. त्याच वेळी आरोपीने मर्सिडीझ भरधाव वेगाने चालवत सिद्धार्थला धडक दिली होती. कारचा वेग ताशी १०० किमी होता. धडक एवढी भयंकर होती की सिद्धार्थ हवेत १० -१५ फूट उंच उडाला जमिनीवर आदळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली आहे. त्यानंतर आरोपी त्याच्या साथीदारासह गाडीतून उतरून फरार झाला.

पोलिसांचा तपास सुरू
पोलिस आरोपीचा पासपोर्ट जप्त करणार आहे. जेणेकरून सुनावणी दरम्यान त्याला देशाबाहेर जाता येऊ नये. किशोरवयीन आरोपीला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दुर्घटनेच्या वेळी तो सज्ञान झालेला नव्हता, असा दावा नातेवाइकांनी केला आहे. तीन दिवसांनंतर शुक्रवारी तो १८ वर्षांचा झाला. पोलिस यासंबंधीचा तपास करत आहेत. स्वत: आरोपीने सज्ञान नसल्याची कागदपत्रे दाखल केली आहेत. परंतु ती बनावट आहेत का, याचा तपास सुरू आहे.