आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीरा कुमार विरोधी पक्ष नेत्याचे भाषण रोखले होते, स्वराज यांनी जारी केला 2013 चा व्हिडिआे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्ट्रपतिपदाच्या विरोधी गटाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी २०१३ मध्ये लोकसभेत अध्यक्षपदी असताना विरोधी पक्षनेत्याला भाषण करण्यापासून रोखले होते. अशा प्रकारची अध्यक्षपदी असताना त्यांनी दिलेली वागणूक होती, अशी टीका केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केली. त्याचबरोबर त्यासंबंधीचा एक व्हिडिआेदेखील रविवारी जारी केला.  

स्वराज यांनी ट्विट करून हा हल्लाबोल केला आहे. सहा मिनिटांचा हा व्हिडिआे आहे. एप्रिल २०१३ मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून सुषमा स्वराज  बोलताना हा व्यत्यय आणला होता, असे स्वराज यांचे म्हणणे आहे. 
 
परराष्ट्रमंत्री स्वराज यांनी तेव्हा त्यांना मीरा कुमार यांनी बोलू दिले नव्हते, असे सांगणाऱ्या वृत्तपत्रातील मथळ्याचे कात्रणही जाहीर केले. आर्थिक घोटाळ्यावरून सुषमा स्वराज यांनी तत्कालीन मनमोहनसिंग सरकारला आपल्या भाषणातून चांगलेच धारेवर धरले होते. हे देशातील सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे, असे विधान करून त्यांनी भूमिका मांडली होती. त्यावर मीरा कुमार वारंवार ‘थँक यू’, ‘ऑल राइट’ असे म्हणत असताना दिसून येतात. त्यातून स्वराज यांनी भाषण कमी करावे, असे स्पष्ट होत होते. वास्तविक सुषमा यांचे भाषण सभागृहाने शांततेत ऐकून घेणे अपेक्षित होते, परंतु भाषण सुरू असताना सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घातला. त्यांना रोखण्याऐवजी मीरा कुमार यांनी विरोधी पक्षनेत्याला बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप स्वराज यांनी केला आहे.  

दरम्यान, गेल्या आठवड्यात राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांचे नाव जाहीर झाले होते. मीरा कुमार या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. त्या लोकसभेतील पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.  
 
पुढील स्लाइडवर क्लीक करून पाहा व्हि़डिओ...
बातम्या आणखी आहेत...