गुडगाव- फेमिना नॉर्थ मिस इंडियाच्या टायटलसाठी एकूण 22 स्पर्धक सौंदर्यवतींची निवड करण्यात आली आहे. गुडगावमधील ईरोज हॉटेलमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली आहे. अंतिम फेरीत तीन स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 400 युवतींनी भाग घेतला होता.
लखनौ, मुरादाबाद, दिल्ली, गुडगाव यासारख्या उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये या स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे 400 युवती सहभागी झाल्या होत्या. त्यातून 22 स्पर्धकांची निवड करण्यात आली. यातून अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धक सौंदर्यवतींची निवड केली जाणार आहे. अखेर त्यातील एका युवतीला फेमिना नॉर्थ मिस इंडियाला टायटल मिळणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या प्रतियोगितेचे देखणे फोटो....
फोटो- पवन कुमार