आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing Dornier aircrafts Beacon Signals Picked Up By Navy Ship

कोस्टगार्डच्या बेपत्ता एयरक्राफ्टचे सिग्नल मिळाले, समुद्रात दिसले ऑइल स्पॉट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नौदलाच्या एका जहाजाला काही ट्रांसमिशन सिग्नल मिळाले आहेत. हे सिग्नल पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कोस्टगार्ड डॉर्निअर एयरक्राफ्टचे मानले जात आहेत. सोमवारी बेपत्ता झालेल्या या एअरक्राफ्टमध्ये तीन क्रू मेंबर्स होते.

आयएनएस संध्यकला हे सिग्नल पॉंडिचेरीच्या दक्षिण भागातील पोर्ट नोवो आणि करयीकालमध्ये मिळाले आहेत. याच ठिकाणच्या जवळपास हे एयरक्राफ्ट बेपत्ता झाले होते. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या महिनीनुसार आयएनएसला 37.5 Khz तीव्रतेचे थांबून-थांबून सिग्नल मिळत असून, हे बेपत्ता एयरक्राफ्टच्या सोनार लोकेटर बिकनचे असू शकतात. या भागातील पाण्यावर तेलाचा तवंग दिसून येत आहे. या तेलाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा संबंधित फोटो...