आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ मोहिमेला टीकाकारांचा अपशकून; उधळपट्टी कशाला? कार्यकर्त्यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मंगळ मोहिमेमुळे जगभरात भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना काही समाजसेवी संस्था आणि इस्रोच्या माजी अध्यक्ष व एका शास्त्रज्ञानेही विरोधी सूर लावला आहे. देशासमोर भूक आणि द्रारिद्रय़चे भयंकर प्रश्न असताना मंगलयान मोहिमेवर 450-500 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याची गरजच काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ समाजसेवक हर्ष मंडेर यांनी मंगलयान मोहीम म्हणजे गरिबीची खिल्ली उडवणारी असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली. भारतात दररोज 23 कोटी लोक भुके ल्या पोटी झोपतात. कोट्यवधी लोक अगदी मूलभूत आरोग्यसेवा, निवारा आणि स्वच्छ पाणी यापासून वंचित आहेत अशा वेळी मंगलयान मोहिमेसारख्या उपक्रमावर एवढी उधळपट्टी हवीच कशाला असा सवाल त्यांनी केला. मंडेर गतवर्षी अन्न सुरक्षा आणि भूसंपादन विधेयकासाठी कार्यकारी समितीचे निमंत्रकही होते.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख माधवन नायर यांनी मंगलयान मोहीम ही निव्वळ मूर्खपणा असल्याची खरमरीत टीका केली आहे. मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचे पुरावे नाहीत, असे अमेरिकी अंतराळ संस्था नासाने रोव्हर यानाच्या अभ्यासावरून सांगितले आहे. अगदी छोट्या मिथेन सेन्सरनेही मिथेन सापडणार नाही, हे सिद्ध झाले असताना ही मोहीम म्हणजे देशाला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. अशा शब्दांत नायर यांनी टीकेची झोड उठवली आहे.

दिवाळीत 5 हजार कोटी उडवतो
ज्येष्ठ शास्त्रज्ञ यू. आर. राव यांनीही मंगलयान मोहिमेच्या यशाबद्दल हुरळून जाण्याचे कारण नाही, असे सांगितले. दिवाळीत देशात 5 हजार कोटींचे फटाके उडवले जातात मग त्याच्या दहा टक्के रकमेत मंगळावर खर्च होत असतील तर एवढा जल्लोष कशासाठी असा सवाल त्यांनी केला.