आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआरएस -१४ : चुकांनी भरलेला आणखी एक अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआरएस- २०१४ अहवालात मागील वर्षांप्रमाणेच अनेक चुका आहेत. विशेष म्हणजे, आयआरएस अहवालावर आक्षेप नोंदवणाऱ्या पाचही प्रकाशकांची वाचक संख्या वाढली आहे. दैनिक भास्करची वाचक संख्या ८ टक्के, दैनिक जागरणची वाचक संख्या ७ टक्के आणि अमर उजालाची वाचक संख्या १० टक्क्यांनी वाढली. टाइम्स ऑफ इंडियाची ५ टक्के आणि हिंदूचे वाचक १० टक्क्यांनी वाढले आहेत. या सर्वांचा प्रतिस्पर्धी हिंदुस्तान टाइम्स आणि हिंदुस्तान यांच्या वाचक संख्येत खूपच कमी (दोन्ही ४ टक्के) वाढ झाली आहे.

ही आकडेवारी जास्त वाढ असणाऱ्या पाचही वृत्तपत्रांसाठी उत्साहवर्धक असू शकते, मात्र सत्य आणि नि:पक्षतेमुळे ही वृत्तपत्रे तसे करत नाहीत. कारण, आयआरएस-२०१४ या शब्दांमुळे हा इंडियन रीडरशिप सर्व्हेचा पूर्णपणे स्वतंत्र भाग आहे, असे वाटते. मात्र, वास्तवात तीन चतुर्थांश सर्व्हे आयआरएसच्या-२०१३ मधील बदनाम सर्व्हेप्रमाणेच आहे. केवळ एक चतुर्थांश नमुने नवे आहेत.

वाचकांना आठवत असेलच की, देशातील १८ प्रमुख वृत्तपत्र समूहांनी एकाच सुरात आयआरएस-२०१३ वर टीका केली होती. तो पूर्णपणे दोषपूर्ण होता. वृत्तपत्रांनी जनहितासाठी प्रकाशित केलेल्या आवाहनात म्हटले होते- या सर्व्हेत चकित करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. ज्या तर्कहीन व सर्वसाधारण समजाच्या विरोधात आहेत. हा सर्व्हे ऑडिटेड प्रसार संख्येबाबतही (एबीसी) विरोधाभास निर्माण करणारा आहे.

त्यात अनेक चुकीच्या बाबी होत्या. त्या सर्व्हेनुसार हिंदू बिझनेस लाइनबाबत चेन्नईच्या तुलनेत मणिपूरमध्ये तीनपट वाचक वाढले, नागपुरातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र हितवादची प्रकाशित प्रतींची आकडेवारी ६० हजार होती, तर वाचक एकही नव्हता. दिल्लीतील इंग्रजी वृत्तपत्रांच्या वाचकांची संख्याही १९.५ टक्क्यांनी घसरली होती. आयआरएस- २०१३ अनेक मीडिया कंपन्यांनी रद्द केला होता. यात दैनिक भास्कर, जागरण समूह, हिंदू, बॅनेट कोलमॅन अँड कंपनी लिमिटेड (टाइम्स ऑफ इंडियाचे प्रकाशक) आणि अमर उजाला यांचा समावेश होता. काही मीडिया समूहाने त्यानंतर आयआरएसचे सदस्यत्व रद्द केले होते.

आयआरएस-२०१३ भेदभाव आणि चुकीने परिपूर्ण होता. नव्या फेरीतही त्यांची तीन चतुर्थंाश आकडेवारीच विश्वासार्ह मानण्यात आली आहे. यामुळे अनेक चुका पुन्हा होणे स्वाभाविक आहे. यातील सर्वात वाईट पैलू म्हणजे, नव्या नमुन्यांसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०१४ मध्ये फील्डवर्क करण्यात आले. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर वर्षभरापूर्वी. त्यामुळे खरे तर या सर्व्हेचे खरे नाव आयआरएस क्यू-१, २०१४ असायला हवे. तरीही त्याला आयआरएस-२०१४ असे संबोधण्यात येत आहे. त्यामुळे ही आकडेवारी पूर्ण वर्षभराची आहे, असे वाटते. अनेक त्रुटींबाबत माहिती असतानाही एमआययूसीसारख्या प्रतिष्ठित संघटनेने जुने आकडे का जारी केले यामागचे कारण समजत नाही.

आयआरएसने लवकरच बिनचूक सर्व्हे तयार करावा, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत ही वृत्तपत्रे त्यांच्या िवसंगत आकडेवारीकडे बोट दाखवतील व त्यावर विश्वास ठेवणार नाहीत, भले तो आपल्या बाजूने असला तरीही.