आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळे उघड करणा-या सोमय्यांनी राहुल गांधींचा \'घोटाळा\' होता होता टाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेत जरी भाजप आणि काँग्रेस एकमेकांशी भांडणे करताना दिसत असले, तरी सभागृहाच्या बाहेर हे दोन्ही पक्ष एकमेकांचा बचावही करत असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संबंधित असेच एक रंजक प्रकरण समोर आले आहे. त्यांना वाचवण्यासाठी भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांनी मदत केली.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या हस्ते एक पत्र पाठवले होते. त्यात हुमायूं रस्त्यावर असलेला सी-1/7 बंगला त्यांना ‘गेस्ट अकोमोडेशन’ तत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मोठ्या कालावधीपासून या बंगल्याचा वापर आपण मतदारसंघाच्या कार्यालयासाठी करत असल्याचेही त्यांनी पत्रात लिहिले होते. त्यामुळे यावेळीही हा बंगला आपल्यासाच मिळावा अशी विनंती राहुल गांधींनी केली होती. पण हा बंगला काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांच्या नावाने मंजूर करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी 11 जुलै, 2014 रोजी हे पत्र लिहिले होते.
सभापतींच्या कार्यालयात हे पत्र पोहोचल्यानंतर ते पत्र ‘पार्लामेंट हाऊस कमेटी’कडे पाठवण्यात आले. या कमेटीचे अध्यक्ष भाजप खासदार किरीट सोमय्या हे आहेत. त्यांच्याकडे हे पत्र पोहोचले, त्यावेळी त्यांना एका काँग्रेस नेत्याद्वारे या संदर्भात राहुल गांधींना संदेश पाठवला. ते आतापर्यंत या प्रकरणात जे काही करत आहेत, ते चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी पत्र मागे घ्यावे, अन्यथा ते अडचणीत येऊ शकतात असा निरोप त्यांनी राहुल गांधींना पाठवला. अखेर राहुल यांनी 18 जुलैला पुन्हा एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी बंगल्यासाठीचा अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले.

काय आहेत नियम :
नियमानुसार ‘गेस्ट अकोमोडेशन' च्या नावाने देण्यात आलेल्या बंगल्यांचा वापर मतदारसंघाचे कार्यालय म्हणून करता येत नाही.

राहुल यांच्याकडे आधीचा एक बंगलाही आहे
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या नावावर 12 तुघलक रोडवर आधीचा एक बंगला आहे. तरीही बंगल्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे.
फाइल फोटो : कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी