आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा सन्स- मिस्त्रींनी आमच्या विश्वासाला तडा दिला, स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याची होती तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टाटा सन्सने 9 पानी पत्र लिहून सायरस मिस्त्रींच्या आरोपांना उत्तर दिले आहे. टाटा समुहाने म्हटेल आहे, की मिस्त्रींनी आमच्या विश्वासाला तडा दिला आहे. ते टाटा ग्रुपच्या मुख्य ऑपरेटिंग कंपन्यांमधून दुसऱ्यांना बाहेर करुन स्वतःचे वर्चस्व स्थापित करु पाहात होते. मिस्त्रींची स्ट्रॅटिजी होती की टाटा बोर्डमध्ये ते एकटेच टाटांचे रिप्रेझिंटेटीव्ह राहावे. त्यांनी हा प्लॅन फार विचारपूर्वक आखला होता आणि त्यावर ते चार वर्षांपासून काम करत होते. टाटा समूहाने गेल्या महिन्यात मिस्त्री यांना चेअरमन पदावरुन दूर केले होते. त्यांच्या जागेवर 78 वर्षांचे रतन टाटा यांना चार महिन्यांसाठी चेअरमन नियुक्त केले गेले आहे.

काय म्हणाले टाटा सन्स
- 'जेव्हा टाटा सन्सने मिस्त्रींनी हटविले तेव्हा जगभरातून आमच्याकडे फोन आणि इ-मेल्स येत होते. काही लोकांनी विचारले की समूहाचे भविष्य कसे असेल. आम्हाला माहित आहे की या निर्णयामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. समूह आपल्यावतीने काही तथ्य समोर ठेवू इच्छित आहे.'
- टाटा समूह आपल्या शेअरहोल्डर्सला उत्तरदायी आहे.
- सायरस मिस्त्री चार वर्षे समूहाचे चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही.

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...