आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये थांबलेल्या रशियन तरुणीचा वेटरने बनवला एमएमएस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गाझियाबादमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेल्या रशियन तरुणीचा अश्लिल व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमधील एका वेटरने हा प्रताप केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

रशियातून भारतात पर्यटनासाठी आलेली 23 वर्षीय तरुणी गाझियाबादमधील कौशांबीमधील पॅसेफिक मॉलसमोरील एका हॉटेलमध्ये थांबली होती. गाइड प्रदीप कुमार आणि तिने दोन खोल्या बुक केल्या होत्या. गुरुवारी रात्री तरुणी तिच्या खोलीत झोपली होती. रात्रीचा फायदा घेऊन हॉटेलमधील एका वेटरने तिला व्हिडिओ शूट केला. पीडित तरुणी जर्मनीचा दौरा करून भारतात आली होती.

दरम्यान, नवी दिल्लीत गुरुवारी पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली होती. चार नराधमांनी नवदाम्पत्याला नोकरी आणि भाड्याने घर देण्याचे आमिष दाखवून तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच पतीसमोरच 20 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार केला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... 'पतीसमोरच चार नराधमांनी लुटली नवविवाहितेची अब्रु'