आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत खासगी कंपनीच्या संचालकाकडून महिला व्यवस्थापिकेवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुडगावमधील एका नामांकीत कंपनीच्या संचालकानेच कंपनीच्या महिला व्यवस्थापिकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच एचआर विभागातील अधिकार्‍यांनी तिच्यासोबत अश्लिल चाळे केल्याचे समजते.
कंपनीच्या संचालकांनी पीडितेला आपल्या कॅबीनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत लिहिले आहे. तसेच कंपनीतील दोन वरिष्ठ सहकार्‍यांवरही पीडितेने आरोप केले आहे. अश्लिल चाळे करणे, छेड काढ्ल्याचाही आरोप दोघांवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी शुन्य क्रमांकाने प्राथमिक अन्वेषण अहवाल (एफआयआर) दाखल केला असून गुडगाव पोलिसांत हे प्रकरण वर्ग करण्‍यात आले आहे.

गुड़गाव पोलिसांनी एचआर विभागातील अधिकार्‍यांसह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांच्यावर आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गाझियाबादमधील रहिवासी पीडित महिला नोएडा येथील एका नामांकीत कंपनी व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी संबंधित महिला गुड़गावमधील यूनिटमध्ये काम करत होती. गुडगावमधील गोल्फ कोर्स रोड भागातील ऑफिसमध्ये बोलावून एचआर विभागातील पाच अधिकार्‍यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर कंपनींच्या संचालकाने कॅबीनमध्ये बोलवून बलात्कार केला.
आरोपी राहुल सिंह, पवन भल्ला, रजत तिवारी, पूजा खन्ना, नितिन, वर्षा सिंह, गॅरी जोसेफ यांच्यावर पीडितेसोबत अश्लिल चाळे केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, याप्रकरणी कंपनीच्या सूत्रांनी सांगितले, की पीडित महिलेला गेल्या 3 डिसेंबरला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आज (मंगळवारी) तिने कंपनीच्या संचालकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.