आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलचे कॉलदर 20 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोबाइलचे कॉल दर लवकरच स्वस्त होऊ शकतात. दूरसंचार नियामक ट्रायने इंटरकनेक्ट युजेस चार्जेस कमी करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या पंधरा-वीस दिवसांत या संबंधीचा निर्णय घेतला जाईल. असे झाले तर कॉल दरांमध्ये २० टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ऑपरेटर कंपनी दुसर्‍या ऑपरेटर्सचे कॉल आपल्या नेटवर्कवर जोडण्यासाठी २० पैसे प्रतिकॉल दराने शुल्क आकारणी करते. ऑपरेटर्सकडे कॉल दरांव्यतिरिक्त मोबाइलवर कमाईचा अन्य पर्याय उपलब्ध नव्हता. मात्र आता मोबाइल ऑपरेटर्सकडे गेमिंग, डाटा यासारखे कमाईचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याचे दरही कंपन्या आपल्या पद्धतीने निश्चित करत आहेत, त्यामुळे हे शुल्क कमी झाले पाहिजे, असे ट्रायला वाटते.