आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करसवलतीचा नोकियाचा अर्ज कोर्टाने फेटाळला; बॅटरी चार्जर मोबाइलची अॅसेसरी, पार्ट नव्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॅटरीचार्जरला मोबाइलचा पार्ट म्हटले जाऊ शकत नाही. ते एक स्वतंत्र उत्पादन असून ते वेगळे विकले जाऊ शकते, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. नोकिया कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जी. मुखोपाध्याय एम. बी. लोकूर यांच्या खंडपीठाने अधिकारी व्हॅट ट्रॅब्यूनलचा निर्णय योग्य ठरवला. यात ट्रॅब्यूनलने हँडसेट चार्जर या वेगवेगळ्या वस्तू असल्याचे सांगून त्यानुसार स्वतंत्र कर आकारणी केली होती. त्याविरोधात नाेकिया इंडियाने केलेला युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. कंपनीने म्हटले होते की, बॅटरी चार्जर सेलफोनसोबत पॅकेजमध्ये विकली जाते. त्यामुळे सेलफोन त्याच्या पार्टससाठी मिळणारी करसवलत चार्जरलाही देण्यात यावी, अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली होती. परंतु ती न्यायालयाने ग्राह्य धरली नाही. नोकिया इंडियाने कर आकारणीला न्यायालयात अाव्हान दिले होते.