आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या आग्रा भेटीत मोबाइल होणार ठप्प, दोन ते तीन तास नेटवर्क राहणार जाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २७ जानेवारी रोजी आग्रा येथे एक ते दीड तासांसाठी येतील. या दरम्यान शहरातील अनेक परिसरात शुकशुकाट राहील. दोन ते तीन तास मोबाइलची बेलही वाजणार नाही. हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे वानगीदाखल उदाहरण सांगता येईल.

ओबामा येण्याच्या अगोदर आणि नंतर संपूर्ण शहरात मोबाइल सेवा ठप्प राहील. दूरसंचार विभागाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत. ओबामा हवाईदलाच्या विमानाने गेल्यानंतर काही वेळाने नेटवर्क सुरू होईल. २००० मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आग्रा येथे आले होते. त्यावेळी जॅमरने मोबाइल नेटवर्क ठप्प करण्यात आले होते. या वेळी मात्र टॉवरने ते बंद करण्यात येईल. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल यांच्या समवेत दोन्ही मुली मालिया व साशा भारत दौ-यावर येणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार बेन रोड्स यांनी गुरुवारी ही माहिती दिली. शाळांना सुटी असते. त्याचवेळी मुली मम्मी-डॅडींसोबत दौ-यावर जातात, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व काही टीमच
ओबामा यांच्या आग्रा दौ-याची सर्व व्यवस्था अमेरिकी टीमच्या हाती आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मागण्यात आलेली नाही. प्रशासन व नगरपालिका शहराची स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या तयारीला लागले आहे.

१० वा. दिल्लीत
नवी दिल्लीत गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन म्हणाले, बराक ओबामा रविवारी सकाळी १० वाजता पालम विमानतळावर पोहोचतील. ऊर्जामंत्री पीयूष गोयल त्यांचे स्वागत करतील. ओबामा विमानतळावरून सरळ राष्ट्रपती भवनावर पोहोचतील.