आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कुठेही जा, मोबाइल क्रमांक तोच राहणार, मोबाइल पाेर्टेबिलिटी आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आजपासून देशभरात मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी लागू होत आहे. म्हणजे आता देशाच्या कोणत्याही भागात गेलात तरी तुम्हाला मोबाइल नंबर बदलावा लागणार नाही. तोच नंबर पूर्ण देशात चालू शकेल. तोही राेमिंग शुल्काशिवाय. त्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. खर्चही फक्त १९ रुपये येईल. प्रीपेड व पोस्टपेड दोन्हींसाठीही ही सुविधा आहे. आजवर एकाच सर्कलमध्ये पोर्टेबिलिटीची मुभा होती.
ही सुविधा कशी घेता येईल...
- मोबाइलच्या मेसेज बाॅक्समध्ये जाऊन PORT टाइप करा. मग स्पेस देऊन तुमचा मोबाइल नंबर लिहा व १९००वर पाठवा.
- थोड्या वेळाने तुमच्या मोबाइलवर एक आठ आकडी युनिक कोड येईल.
- हा युनिक कोड पोर्टेबिलिटीच्या विहित नमुन्यात आणि ग्राहक अर्जाच्या फाॅर्मसह कंपनीच्या
आऊटलेटवर दाखल करावा.
- फॉर्म दाखल केल्यावर तुमच्या खात्यातून १९ रु. कपात हाेतील.
- त्यानंतर जुने बिल (बाकी असल्यास) भरावे लागेल आणि मग नवे सिम मिळेल.
- मग नेटवर्क शिफ्टिंगचा एसएमएस मिळेल व मोबाइल कंपनी बदलली जाईल.
- प्रीपेड युजर्स बॅलन्स ट्रान्सफर आणि पोस्टपेड युजर्स कॅरी फॉरवर्ड करू शकतील.